सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 15:53 IST2021-12-02T15:53:28+5:302021-12-02T15:53:49+5:30
मुलीची इच्छा नसताना बळजबरीने तिच्याशी आरोपीने शरीरसंबंध निर्माण केले आणि तो विवाहित आहे, हे त्याने लपवून ठेवले

सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
पुणे : विवाहित असताना ते लपवून अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करुन एका सराईत गुन्हेगाराने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो विवाहित असल्याचे समजल्यावर त्याने या युवतीला जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दादु कॉलविन (वय ३०, रा. मासेआळी, उत्तमनगर) याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत उत्तमनगरमधील एका १७ वर्षाच्या युवतीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१९ ते १ डिसेबर २०२१ दरम्यान घडला आहे.
दादु कॉलविन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने फिर्यादीचा पाठलाग करुन तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. तिची इच्छा नसताना बळजबरीने तिच्याशी शरीरसंबंध निर्माण केले. तो विवाहित आहे, हे त्याने फिर्यादीपासून लपवून ठेवले. फिर्यादी हिला तो विवाहित असल्याचे समजल्यावर तिने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने फिर्यादी व तिच्या आईला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.