ओतूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: September 15, 2016 01:43 IST2016-09-15T01:43:15+5:302016-09-15T01:43:15+5:30

येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी ओतूर पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली

Minor girl gang rape in Otur | ओतूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ओतूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ओतूर : येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी ओतूर पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार शरद लोखंडे यांनी दिली.
याबाबत चेतन नरेंद्र नंदनवार (वय २३), गणेश शिवाजी बावस्कर (वय २२), शंकर शिवाजी लोहोकरे (वय २२) व स्वप्निल भास्कर फाले (वय २२, सर्व रा. ओतूर) यांना सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. सदर पीडित अल्पवयीन मुलीवर अरोपी चेतन नंदनवार व गणेश बावस्कर यांनी ओळखीचा गैरफायदा घेऊन जुलै २०१६मध्ये माडवी नदीच्या किनारी असलेल्या एका कपारीमध्ये नेऊन बलात्कार केला. हे चेतन व गणेशचे मित्र शंकर शिवाजी लोहोकरे व स्वप्निल भास्कर फाले यांना समजले. याचाच गैरफायदा घेऊन शंकर व स्वप्निल यांनी ‘तू काय करतेस, आम्हाला माहिती आहे’ असे म्हणून दि. ११ आॅगस्ट रोजी स्वप्निलच्या राहत्या घरात तिला नेले व घराची कडी लावून बलात्कार केला. तीन महिन्यांपासून सदर पीडित मुलीवर चारही आरोपी धमकी देऊन अत्याचार करीत होते. ही बाब पीडित मुलीच्या नातलगांना समजली. यानंतर पीडित मुलगी व तिच्या नातलगांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३७६ (२) (क ) (ठ) (ड), ५०६ व बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२चे कलम ४, ६, ८, १० अन्वये गुन्हा नोंदवून अरोपींना अटक केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Minor girl gang rape in Otur