The minor children given to parents who leaved tasgaon from loveship | तासगावहून पळून आलेल्या अल्पवयीन मुलामुलीला केले पालकांच्या स्वाधीन 
तासगावहून पळून आलेल्या अल्पवयीन मुलामुलीला केले पालकांच्या स्वाधीन 

पुणे : तो पुण्यात बीएस्सीच्या तिसऱ्या वर्षाला तर ती दहावीला़ पण दोघांचे एकमेकांवर प्रेम होते़. त्यातूनच ते पुण्यात पळून आले़. दोन दिवस ते त्याच्या खासगी होस्टेलमध्ये राहिले़ . सारसबागेत ते बसले असताना दामिनी पथकाच्या मार्शलांच्या नजरेत ते पडले़. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांचे हकीकत समजली़. त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधल्यावर खरा प्रकार समोर आला़. तेव्हा त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले़. दुसरीकडे मुलीच्या घरच्यांनी मुलाविरुद्ध पळून नेल्याची तक्रार दाखल केली आहे़. 
दामिनी पथकातील जयश्री भालेराव व स्वाती रणसिंग या सारसबागेत गस्त घालत होत्या़. जॉगिग ट्रॅकच्या कडेला बसलेल्या जोडप्यांना त्या उठवित होत्या़. तेव्हा त्यांची नजर या दोघांवर पडली़. त्यांचे वय कमी वाटल्याने त्यांनी चौकशी केल्यावर मुलगी १५ वर्षाची असून मुलगा १९ वर्षाचा असल्याची माहिती मिळाली व ते घरी काही न सांगता पळून आल्याचे त्यांनी सांगितले़. तेव्हा त्यांनी मुलीच्या घरच्यांशी संपर्क साधला़. त्यांनी मुलीच्या मामाने मुलाविरुद्ध तासगाव पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती दिली़. त्यानंतर तासगाव पोलिसांकडून जयश्री भालेराव यांना फोन आला की आम्ही मुलाविरुद्ध मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. त्यांना घेण्यास येत आहोत़ त्याप्रमाणे मार्शल यांनी दोघांना स्वारगेट पोलिसांच्या हवाली केले़. रात्री उशिरा मुलांच्या पालकांकडे दोघांना स्वाधीन करण्यात आले़ महिला मार्शलमुळे घरातून पळून आलेल्या दोघांना परत पालकांच्या स्वाधीन करता आले़. 


Web Title: The minor children given to parents who leaved tasgaon from loveship
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.