शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

‘असेही’ रंगते पुण्यात अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचे नाट्य... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 9:12 PM

भरदिवसा रस्त्यावर एका मुलाचे अपहरण होत असल्याचा प्रकार महिला पोलिसाने कळविल्याने पोलीस यंत्रणा जास्त कार्यक्षमतेने सतर्क होते़.

पुणे : वेळ सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारासची़ स्थळ नवले पुलाजवऴ़़ एक जीप उभी असते़. त्यात तीन ते चार जण एका अल्पवयीन मुलाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीपमध्ये बळजबरीने बसायला लावत असतात. ही बाब कामावर जाणारी एक महिला कॉन्स्टेबल पोलीस पाहते़. ती तातडीने या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन देते़. भरदिवसा रस्त्यावर एका मुलाचे अपहरण होत असल्याचा प्रकार महिला पोलिसाने कळविल्याने पोलीस यंत्रणा जास्त कार्यक्षमतेने सतर्क होते़. तोपर्यंत ती जीप तेथून निघालेली असते़. मार्शल त्यात जीपचा पाठलाग करु लागतात़. काही अंतरावर जीपला थांबविले जाते़. जीपमध्ये एक अल्पवयीन मुलगा असतो़. त्यामुळे पोलीस मार्शललाही तो अपहरणाचा प्रकार वाटतो़. जीपमधील लोक आम्ही पोलीस असल्याचे सांगत असतात़. पण मार्शल त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतात़. पाठोपाठ पोलीस अधिकारी तेथे पोहचतात़.. सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात येते़. तेथे त्यांची चौकशी सुरु होते़. तेव्हा ते खरेच पोलीस असल्याचे निष्पन्न होत या अपहरण नाट्यावर पडदा पडतो़. नवले पुलावर सोमवारी सकाळी हा प्रकार घडला होता़. याबाबतची माहिती अशी, कराड येथील एका खुन प्रकरणात एक अल्पवयीन मुलाला तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले होते़. त्याला येरवडा येथील सुधारगृहात ठेवण्यात आले होते़ .तेथून तो पळून गेला होता़. हा मुलगा नवले पुलाजवळील आपल्या घरी येणार असल्याची माहिती कराड पोलिसांना मिळाली होती़. त्यानुसार त्यांनी नवले पुलाजवळ सापळा रचला होता़. त्या मुलाला पोलीस ताब्यात घेतात़. पण तो जीपमध्ये बसायला तयार नव्हता़. त्यामुळे त्यांच्यातील एक जण त्याला आपण पोलीस असल्याचे सांगून पिस्तुल दाखवतो़. नेमके त्याच वेळी तेथून एक महिला पोलीस कॉन्स्टेबल जात असते़. ती तो प्रकार हाते़ तिला तो अपहरणाचा प्रकार वाटतो व ती पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती देते़. या प्रकाराची माहिती मिळताच सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संगीता यादव व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचतात़ ते पोलीस असल्याची खात्री पटल्यावर त्यांना सोडून दिले जाते़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणPoliceपोलिस