शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादक संकटात

By admin | Updated: May 11, 2015 06:06 IST

खासगी दूध संकलन संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगलेच वेठीस धरले आहे.

लासुर्णे : खासगी दूध संकलन संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगलेच वेठीस धरले आहे. गेल्या चार महिन्यात दुधाचे दर प्रतिलिटर २४ रुपये दरावरून १५ रुपये केले आहेत. तब्बल ९ रुपयांनी झालेल्या घसरणीमुळे दूध उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतकऱ्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. या खासगी दूध उत्पादक संस्थांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने त्यांची मनमानी वाढत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. परंतु एकीकडे जनावरांसाठी ओला चारा टिकवण्याची कसरत तर दुसरीकडे खासगी दूध संस्थांनी पाडलेले दर या कात्रीत दूध उत्पादक सापडला आहे. त्यात पशुखाद्यांचे दरही वाढले आहेत.विहिरींनी तळ गाठला आहे. चारापिके वाचवण्यासाठी शेतकरी कसरत करीत आहे. त्यात दर कमी केल्याने उत्पादकांमध्ये हतबलता दिसून येत आहे. पशुखाद्याच्या दरात प्रतिगोणी पन्नास रुपये कमी करावेत अशी मागणी शेतकरी व दूध उत्पादकांकडून होत आहे.दूधाचे मिळणारे पैैसे व होणारा खर्च यातून हातात काहीच उरत नाही. चारा पुरत नसल्याने तो विकत घ्यावा लागतो. कडवळसाठी १ हजार २00 रूपये गूंठा, मकवाणसाठी हजार रूपये गूंठा तर उसासाठी अडीच हजार रूपये गूंठा मोजावे लागतात. ऐवढा महागडा चारा देवूनही दर मिळत नाही. लाखभर रूपये देवून घेतलेली गाई कशी परवडाणार असा सवाल लासुर्णे येथील शेतकरी सचीन थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. (वार्ताहर)हातात शेणखतदिवसात एका गाईच्या १८ लिटर दुधामागे १६४ रु. तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे एका गाईला एका वेळी दोन ते अडीच किलो पशुखाद्य दिले जाते. दिवसात एका गाईला दोन वेळेला पाच किलो पशुखाद्याचे १७ रुपये प्रमाणे ८५ रुपये होतात. त्याचप्रमाणे गाईला दिवसाला १३ ते १५ किलो हिरवा चारा लागतो. हा सर्व खर्च वजा करता दूध उत्पादकाच्या हातात शेणखतदेखील राहात नाही. त्यामुळे मिळणारा आर्थिक फायदा दूरच राहतो. या गंभीर बाबीची दखल घेऊन राज्य शासनाने हा प्रश्न मार्गी लावावा व दूध उत्पादकाला न्याय द्यावा, अशी मागणी तालुक्यातील दूध उत्पादक करीत आहेत.