ओम नमः शिवाय...! जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी महादेवास दुग्धाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 11:57 IST2022-12-26T11:57:22+5:302022-12-26T11:57:36+5:30

आमदार गोरे गंभीर जखमी असून पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे उपचार सुरू

Milk anointment to Mahadev to improve Jayakumar Gore health | ओम नमः शिवाय...! जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी महादेवास दुग्धाभिषेक

ओम नमः शिवाय...! जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी महादेवास दुग्धाभिषेक

निमगाव केतकी: भाजपचे आमदारजयकुमार गोरे  यांच्या  प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी  निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथील ओबीसी बांधवांनी केतकेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक घालून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी महादेवास साकडे घातले.

माण खटाव तालुक्याचे भाजपा आमदारजयकुमार गोरे यांच्या गाडीचा शनिवारी फलटण तालुक्यात अपघात होऊन गाडी ५० फूट नदीत कोसळून अपघात होऊन आमदार गोरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर  पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. आमदार गोरे आणि निमगावकर यांचे खूप जुने संबंध असल्याने आणि ते ओबीसी प्रवर्गात येत असल्याने निमगाव केतकी या ठिकाणी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

या दुग्धाभिषेक ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापुरे, संदीप भोंग, ॲड. सचिन राऊत,ॲड. सुभाष भोंग, शेतकरी सुखाने समितीचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत करे, राजकुमार जठार, बबन खराडे, माणिक भोंग, संतोष हेगडे, महेश जठार, धनाजी राऊत, विघ्नेश जगताप तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Milk anointment to Mahadev to improve Jayakumar Gore health