डीक्कीचे मिलिंद कांबळे यांना लखनौ विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:07 AM2019-11-12T05:07:15+5:302019-11-12T05:07:18+5:30

उद्योजक ‘पद्मश्री’ मिलिंद कांबळे यांना लखनौ येथील बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यापीठाकडून ‘मानद डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित करण्यात आले.

 Milind Kamble of Dixie received Lucknow University Doctorate | डीक्कीचे मिलिंद कांबळे यांना लखनौ विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’

डीक्कीचे मिलिंद कांबळे यांना लखनौ विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’

googlenewsNext

पुणे : उद्योजक ‘पद्मश्री’ मिलिंद कांबळे यांना लखनौ येथील बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यापीठाकडून ‘मानद डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित करण्यात आले. कांबळे यांनी सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना मानद डॉक्टर आॅफ सायन्स (डी.एस्सी) ही पदवी बहाल केली आहे.
विद्यापीठाच्या आठव्या पदवी प्रदान समारंभात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्या हस्ते पदवीप्रदान झाले. कांबळे यांना प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ पुरस्कार २०१३ मध्ये मिळाला. कांबळे हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असून दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स असोसिएशन (डिक्की) या संस्थेची त्यांनी स्थापना केली. ही भारतातील दलित समाजातील पहिली वाणिज्य संघटना आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, बारामती पाणीपुरवठा योजना या प्रकल्पांबरोबरच बोगदा, धरणे आणि पूल उभारणीमध्ये कांबळे यांनी मोलाचा सहभाग दिला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पहिले संकेतस्थळ त्यांनी तयार केले असून त्याची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. सध्या ते चेअरमन, बोर्ड आॅफ गव्हर्नर्स, आयआयएम जम्मू, राष्ट्रीय एससी-एसटी हबच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष, भारत-मलेशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचे सहअध्यक्ष, वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय उद्योजक पुरस्काराचे; तसेच ज्येष्ठ नागरिक पुरस्काराचे ते ज्युरी सदस्य आहेत.

Web Title:  Milind Kamble of Dixie received Lucknow University Doctorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.