शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

जामिनातील अटींमुळे मुलभूत हक्कावर येतेय गदा : मिलिंद एकबोटे यांचा अर्ज  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 7:57 PM

कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणी जामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांना जामीन देताना घालण्यात आलेल्या अटीमुळे मुलभूत हक्कावर गदा येत आहे.

ठळक मुद्देअटी शर्तींचा भंग झाल्यास जामीन रद्द करण्यात येईल असेही आदेशात नमूद शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रॉसिटी, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान या कलमानुसार गुन्हा दाखल २३ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार

पुणे : कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणी जामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांना जामीन देताना घालण्यात आलेल्या अटीमुळे मुलभूत हक्कावर गदा येत आहे.त्यामुळे या अटी शिथील कराव्यात, अशी मागणी करणारा अर्ज एकबोटे यांनी न्यायालयात दाखल केला आहे.     एस. एन. शिरसीकर यांच्या न्यायालयात या  प्रकरणाची २३ नोव्हेंबर सुनावणी होणार आहे. सध्या वापरात असलेला मोबाइल नंबर पोलिसांना देण्याचे, पत्रकार परिषद न घेणे, सभा न घेणे, पोलिसांना तपासात सहकार्य करणे, सभेत भाषण न करणे, दर सोमवारी शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय भारत सोडून न जाणे अशा विविध अटी त्यांना जामीन देताना घालण्यात आल्या होत्या. तसेच अटी शर्तींचा भंग झाल्यास जामीन रद्द करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र आता एकबोंटे यांनी या अटी शिथिल कराव्यात म्हणून अर्ज दाखल केला आहे. कोरेगाव भिमा हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, योगेश नरहरी गव्हाणे, गणेश भाऊसाहेब फडतरे आणि अनिल दवे या पाच जणांवर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रॉसिटी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक करून त्यांना १५ मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणात एकबोटे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यानी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना विविध अटीशर्तीवर जामीन देण्यात आला होता. एकबोटे यांच्या अर्जा विरोधात भिमाबाई तुळवे या महिलेच्या वतीने अ‍ॅड. जितेंद्र कांबळे यांनी लेखी म्हणणे सादर केले असून यावर २३ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारMilind Ekboteमिलिंद एकबोटेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी