शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:21 IST

पुणे : कोंढवा येथे महापालिकेने हज हाऊस बनविण्याचे काम सुरू केले आहे. या धार्मिक स्थळाला विरोध करीत धार्मिक भावना ...

पुणे : कोंढवा येथे महापालिकेने हज हाऊस बनविण्याचे काम सुरू केले आहे. या धार्मिक स्थळाला विरोध करीत धार्मिक भावना दुखावणे आणि जातीय दंगल भडकविण्याच्या उददेशाने भाषण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एकबोटेंना शुक्रवारी (दि. १२) अटकपूर्व जामीन मंजूर केला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. संभाजी बिग्रेडतर्फे या प्रकरणी फिर्याद देण्यात आली. मिलिंद एकबोटे यांच्यातर्फे अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अ‍ॅड. एस. के. जैन, अ‍ॅड. अमोल डांगे यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता.

या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध शाहाफाजील मोईनुदद्दीन सिददीकी आणि सतीश भास्कर काळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी म्हणून एकबोटे यांनी अर्ज दाखल केला होता. अ‍ॅड. एस. के. जैन आणि अ‍ॅड. अमोल डांगे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले की या प्रकरणी उशीरा एफआयआर दाखल करण्यात आला. अर्जदार यांनी फक्त लक्षात आणून दिले की, हज हाऊस या गोष्टीची बांधणी सिव्हिल आणि कल्चरल सेंटरच्या नावाखाली करण्यात येत आहे. संबंधित जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील आहे. अर्जदार तपासास सहकार्य करण्यास तयार आहेत. पोलिस कोठडीतील चौकशीची गरज नाही.

त्यामुळे या प्रकरणी अर्जदाराला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा. त्यानुसार कोर्टाने मिलिंद एकबोटे यांचा जामीन मंजूर करून पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्याचा आदेश दिला. अर्जदाराने साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करु नये या अटीवर न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

---------------------------------------