शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

MHT CET Result Topper: कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन अन् आई-वडिलांचे आशीर्वाद; पुण्यातील तनय, सिद्धांत, ध्रुव, अनुजचे ‘सीईटी’त शतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:23 IST

MHT CET Result Topper दररोज सुमारे ८ तास सातत्यपूर्ण आणि एकाग्रतेने अभ्यास, घरातून मिळालेली माेलाची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे आम्हाला यश संपादन करता आले

पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने साेमवारी (दि. १६) 'एमएचटी सीईटी' परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, यात राज्यातील २२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळविले आहेत. त्यात पुण्यातील तनय गाडगीळ, सिद्धांत पाटणकर, ध्रुव नातू, अनुज पगार यांचा समावेश आहे. याचबराेबर पुण्यातीलच पृथ्वीराज वाघमाेडे याला ९९.९९ पर्सेंटाइल मिळाले आहेत. (MHT CET Result Topper) 

सातत्यपूर्ण अभ्यासामुळे यश 

या यशाबद्दल तनय गाडगीळ म्हणाला की, मागील दोन वर्षांपासून दररोज सुमारे ८ तास सातत्यपूर्ण आणि एकाग्रतेने अभ्यास करत होताे. अभ्यासातील सातत्य आणि शिक्षणांचे मिळालेले याेग्य मार्गदर्शन यामुळे मी हे यश संपादन करू शकलाे. यात माझ्या आई-वडिलांचाही माेलाचा वाटा आहे. माझ्या या यशाचे श्रेय मी लोयोला हायस्कूल, एमटीईएस कॉलेज आणि एम प्रकाश इन्स्टिट्यूटमधील शिक्षकांना देतो, असेही त्याने सांगितले. त्याचे आई-वडील दाेघेही संशाेधक आहेत.

घरातून मिळालेली साथ माेलाची

अनुज शिवप्रसाद पगार म्हणाला की, सीईटीचा निकाल हाती आला आणि शंभर पर्सेंटाइल मिळाल्याचे कळताच खूप आनंद झाला. माझी आई सुजाता ही नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक आहे, तर वडील शिवप्रसाद हे टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये पुणे आणि पिंपरीत काम करतात. घरातूनही मला या अभ्यासासाठी खूप मदत झाली. त्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलाे.

वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद अन् कष्ट फळाला मिळाले 

मी सिद्धांत पाटणकर. गेली पाच वर्षे अर्थात आठवी ते बारावी सीईटीची तयारी केली. ‘एम. प्रकाश’मध्ये फाउंडेशन तयार केलं आहे. जेईई ॲडव्हान्समध्ये माझा ७९० वा रँक आला आणि आयआयटी मुंबईला इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळाला आहे. सीईटी ॲडव्हान्सला १०० पर्सेंटाइल आले आणि टॉपर्स लिस्टमध्ये माझं नाव झळकलं. याचे कारण मी दररोज न चुकता आठ ते दहा तास अभ्यास करताे. अभ्यासाशिवाय काहीच केलेलं नाही. हे माझे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळे मला हे यश मिळवता आले.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीexamपरीक्षाSocialसामाजिकTeacherशिक्षक