शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो मार्गांवरील रस्ते दुरुस्तीची बिले महामेट्रोला पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 22:19 IST

महापालिकेच्या देयकातून रक्कम कपात करणार

ठळक मुद्देमहापालिकेला तब्बल ९५१ कोटी रुपये महामेट्रोला द्यावे लागणार

पुणे : शहरामध्ये सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामुळे बहुतेक प्रमुख रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, गेल्या चार-पाच महिन्यांत या रस्त्यावर पडलेले खड्डे व लहान-मोठी दुरुस्तीची कामे महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहेत. यामुळे यासाठी झालेला सर्व खर्चाची बिले महामेट्रोला पाठविण्यात येणार असून, ही रक्कम महापालिकेला मेट्रोला देण्यात येणाऱ्या देयकातून कपात करण्यात येणार असल्याचे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी सांगितले.    महामेट्रोच्या वतीने शहरामध्ये सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामध्ये पुणे महापालिका देखील भागीदार आहे. यामध्ये शहरात पहिल्या टप्प्यात सुमारे ११ हजार ५०० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेला तब्बल ९५१ कोटी रुपये महामेट्रोला द्यावे लागणार आहेत. महापालिका हा खर्च मेट्रोला जागेच्या मोबदल्यात देण्यात आहे. आता रस्ते दुरुस्तीचा खर्च देखील या देयकामधून कपात  येणार आहे.शहरामध्ये सध्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी असे दोन मार्गाचे काम सुरु आहे.परंतु सद्या शहरामध्ये मेट्रोच्या वतीने मेट्रो मार्ग आणि मेट्रो स्टेशनची कामे सुरु आहेत. यामुळे मोठा प्रमाणात आवजाड मशनरी आणि वाहनाची मेट्रो मार्गाचे काम सुरु असलेल्या रस्त्यावरून होत आहे.याचा परिणाम गेल्या चार-पाच महिन्यात पावसाळा आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली.     मेट्रोचे काम सुरु असलेल्या रस्त्यांवर सातत्याने खड्डे पडत असल्याने शहरामध्ये होणारी वाहतुक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. याबाबत महामेट्रोला लेखी पत्र देऊन देखील दुर्लक्ष करण्यात येत होते. परंतु नागरिकांचा रोष टाळण्यासाठी ही कामे महापालिकेच्या वतीने करण्यात आली. तसेच काही रस्त्यांवर मेट्रोमुळे नादुरुस्त झालेली ड्रेनेजची कामे देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहेत. या सर्व कामांचा खर्च महापालिकेच्या वतीने आता महामेट्रोला पाठविण्यात येणार असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका