शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचा खर्च ६०० कोटींनी वाढणार?

By admin | Updated: June 19, 2015 01:10 IST

शासकीय कूर्मगतीमुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचा खर्च दररोज २ कोटी रुपयांनी वाढत आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेकडून आॅगस्ट

पुणे : शासकीय कूर्मगतीमुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचा खर्च दररोज २ कोटी रुपयांनी वाढत आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेकडून आॅगस्ट २०१४ मध्ये सुधारित आराखडा करण्यात आला होता. मात्र, हे काम सुरू झाले नाही. त्यामुळे आता पुन्हा नव्याने आराखडा तयार करावा लागणार आहे. मात्र, मान्यतेसाठी झालेल्या दिरंगाईने प्रकल्पाचा खर्च गेल्या वर्षभरात तब्बल ६०० ते ७०० कोटी रुपयांनी वाढणार आहे. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर आॅगस्ट महिन्यात नागपूर मेट्रोच्या भूमिपूजनानंतर केंद्र व राज्य शासनात पुणे मेट्रोवरून राजकीय आखाडा रंगल्यानंतर आॅगस्ट २०१४ मध्ये राज्य शासनाने मेट्रोचा सुधारित खर्च आणि मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर उभारल्या जाणाऱ्या निधीवरील व्याजदाराची माहिती महापालिकेकडून मागविण्यात आली होती. ही माहिती पालिका प्रशासनाने आज तातडीने दिल्ली मेट्रो रेल कॉंर्पोरेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून ती राज्य शासनास सादरही करण्यात आली. त्यानुसार, मेट्रोची सुधारित किंमत १० हजार ८७९ कोटी वाढली आहे. त्यानंतर या प्रकल्पाचे नोव्हेंबर २०१४ मध्ये केंद्राच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (पीआयबी) समोर सादरीकरणाची तारीखही निश्चित झाली होती. त्यांना हा प्रकल्प डिसेंबर २०१४ पर्यंत सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, असे असतानाच या प्रकल्पास काही संस्थांनी, तसेच तज्ज्ञांनी मेट्रो भुयारी असावी, अशी मागणी केल्याने हे सादरीकरण थांबविण्यात आले. त्यानंतर जून २०१५ उजाडला तरी केंद्राकडे या प्रकल्पाचे सादरीकरण झालेले नाही. त्यामुळे आता केंद्राची मान्यता घेण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने खर्चाचा सुधारित आराखडा तयार करावा लागणार आहे. मागील वर्षीच्या आराखड्यात प्रकल्पासाठी २०१४-१५ या आर्थिक वर्षातील किमती गृहीत धरण्यात आल्या होत्या. मात्र, आता २०१५-१६या वर्षीच्या किमतीचा विचार करावा लागणार आहे. भूसंपादनाचा वाढणार भार ४पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांसाठी महापालिकेस कराव्या लागणाऱ्या भूसंपादनात ७५ टक्के जागा शासकीय, तर २५ टक्के खासगी आहे. मागील वर्षीच्या अहवालात, या भूसंपादनासाठी गृहीत धरण्यात आलेला खर्च जुन्या कायद्यानुसार होता, तर या वर्षी नव्याने आलेल्या भूसंपादन कायद्याने हा २५ टक्के खासगी जमिनीचा खर्चही वाढणार आहे. त्याचा समावेशही नव्या अहवालात करावा लागणार आहे. आठ हजार कोटींचा प्रकल्प पोहोचणार ११ हजार कोटींवर ३१ किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या खर्चाचा अहवाल २००९ मध्ये सादर केला होता. त्यानुसार, काम वेळेत सुरू झाले असते, तर वनाज ते रामवाडी मार्गाचा खर्च २ हजार ५९३ कोटी रूपये आला असता आणि पिंपरी ते स्वारगेट या १६ किलोमीटर लांबीच्या मार्गात शिवाजीनगर ते स्वारगेट ५.१९ किलोमीटर (भुयारी मार्ग) ११.५७ किलोमीटर (जमिनीवरील मार्ग) साठी ५ हजार ६१८ कोटी रूपये होता.हा प्रकल्प २००९-१० मध्येच सुरू झाला असता, तर त्यासाठी एकूण ८ हजार दोनशे ११ कोटी रूपयांचा खर्च करावा लागला असता. मात्र, प्रकल्पास दिरंगाई होत गेल्याने तब्बल दोन ते अडीच वर्षे हा प्रकल्प मान्यतांच्या फेऱ्यांमध्येच रखडला होता. या प्रकल्पाचा खर्च आॅगस्ट २०१४ मध्ये सुधारित अहवालानुसार, १० हजार ८६९ कोटींवर पोहोचला, आता तो आणखी ६०० कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञाच्या मते प्रकल्पास होणाऱ्या दिरंगाईमुळे दर दिवशी दोन कोटी रूपयांनी वाढत आहे.४या वाढलेल्या खर्चात नवीन भूसंपादन कायद्यामुळे द्यावा लागणाऱ्या जादा मोबदल्याचाही समावेश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मागील वर्षी १० हजार ७६९ कोटींवर पोहोचलेल्या या प्रकल्पाचा खर्च आता ११ हजार ४०० कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे.प्रकल्पासाठीचा खर्च मागील आर्थिक वर्षापर्यंतचा प्रस्तावित होता. मात्र, त्यात आता काही बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास पुन्हा नव्याने अहवाल तयार करावा लागेल. दर वर्षी प्रकल्पासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती बदलत असल्याने प्रकल्पाची किंमत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर मान्यता मिळविण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. सुधारित खर्चाचा अहवाल मागितल्यास त्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. तशा सूचना मिळताच त्याचे काम तत्काळ पूर्ण केले जाईल.- कुणाल कुमार (महापालिका आयुक्त) तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या समावेशाचे काय ? ४पुण्यातील मेट्रो भुयारी असावी की जमिनावरून यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र तज्ज्ञ समिती नेमली होती. ४या समितीने आपला अहवाल राज्य शासनास सादर केला असून, त्यानुसार हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्राकडे पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेकदा सांगितले आहे. ४त्यामुळे या तज्ज्ञाच्या अहवालानुसार,मेट्रो मार्गामध्ये काही बदल झाल्यास त्याचा प्रकल्प खर्चावर परिणाम पडणार आहे. त्यामुळे या सुधारणांचा समावेशही नवीन खर्चात करावा लागणार आहे.