‘स्मार्ट कार्ड’वरच 'मेट्रो' अन् ‘पीएमपी'; एकाच कार्डवर दोन्हीचा प्रवास करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:18 IST2025-10-17T16:17:49+5:302025-10-17T16:18:13+5:30

सध्या प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करताना आणि ‘पीएमपी’तून प्रवास करताना वेगवेगळे तिकीट काढावे लागत होते

'Metro' and 'PMP' on 'smart card'; You can travel on both with a single card | ‘स्मार्ट कार्ड’वरच 'मेट्रो' अन् ‘पीएमपी'; एकाच कार्डवर दोन्हीचा प्रवास करता येणार

‘स्मार्ट कार्ड’वरच 'मेट्रो' अन् ‘पीएमपी'; एकाच कार्डवर दोन्हीचा प्रवास करता येणार

पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्यांना ‘मेट्रो’, ‘पीएमपी’ यासाठी एकाच कार्डवर प्रवास करता येणार आहे. पुणे मेट्रो टप्पा-१, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि पीएमपी बस या तिन्ही ठिकाणी प्रवाशांना एकाच कार्डावर प्रवास करता यावी, यासाठी तीनही प्रशासनाकडून ‘स्मार्ट कार्ड’चे काम सुरू आहे. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो आणि पीएमपी बस यासाठी एकच कार्ड वापरता येणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) सार्वजनिक प्रवासी सेवा देण्यात येते. तसेच पुणे आणि पिपंरी-चिंचवड शहरात ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’कडून (महामेट्रो) प्रवासी सेवा सुरू आहे. सध्या प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करताना आणि ‘पीएमपी’तून प्रवास करताना वेगवेगळे तिकीट काढावे लागते. त्यासाठी वेगवेगळ्या ॲपचा वापर करावा लागतो. तर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा मार्च २०२६ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना त्या मार्गावर प्रवास करताना वेगळे तिकीट काढून प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. प्रवाशांच्या सोयीसाठी तिनही ठिकाणी एकाच कार्डवर प्रवास करता यावा, यासाठी प्रशासनाकडून ‘वन पुणे कार्डा’वरच त्यांची सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील काही महिन्यांत ही सेवा प्रवाशांना मिळणार आहे.

‘पेमेंट गेट’वे अडचण दूर करणार

महामेट्रो आणि पीएमपी या दोन्ही यंत्रणांकडून ऑनलाइन तिकिटाचे पैसे घेण्यासाठी वेगवेगळ्या बँकांचा वापर केला जातो. त्यामुळे ‘पेमेंट गेट वे’ वेगवेगळे असल्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पुणेरी मेट्रोसोबत याबाबत बैठक झाली असून, ‘वन पुणे कार्ड’बाबत त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे महामेट्रो व पुणेरी मेट्रोचा प्रवास सुरुवातीपासूनच एकाच कार्डवरून करता यावा, यादृष्टीने सुविधा निर्माण केली जाणार आहे.

‘पीएमपी’च्या ॲपवर मेट्रोचे तिकीट

पीएमपी व महामेट्रो यांच्याकडून एकत्रित तिकीट प्रणाली विकसित केली जात आहे. ‘आपली पीएमपीएमएल ॲप’वरून मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी प्रणालीचे इंटिग्रेशन केले जात आहे. त्यासाठी ‘ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग’चे आदानप्रदान केले जाणार आहे. त्यानंतर दोन्ही तिकिटे जोडली जातील. एकाच कार्डवरून तिकीट निघावे, यासाठीही काम सुरू आहे, अशी माहिती ‘पीएमपी’ने दिली आहे.

‘महामेट्रो’कडून पीएमपी, पुणेरी मेट्रो यांच्यासोबत एकाच कार्डावरून प्रवासाची सोय व्हावी; म्हणून त्यावर काम सुरू केले आहे. पुणेरी मेट्रो, ‘पीएमपी’सोबत चर्चा करून त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम सुरू आहे. नवीन मेट्रो मार्ग सुरू होईपर्यंत येत्या वर्षात पुणेकरांना एकाच कार्डवरून प्रवास करता येईल, यासाठी आम्ही काम करत आहोत. - चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महासंचालक (जनसंपर्क), महामेट्रो

Web Title : पुणे मेट्रो और पीएमपी बस के लिए जल्द ही एक स्मार्ट कार्ड

Web Summary : पुणे के यात्री जल्द ही मेट्रो और पीएमपी बस यात्रा के लिए एक स्मार्ट कार्ड का उपयोग करेंगे। 'वन पुणे कार्ड' का उद्देश्य पुणे, पिंपरी-चिंचवड और पीएमआरडीए क्षेत्रों में टिकटिंग को एकीकृत करना है। एकीकरण का काम चल रहा है।

Web Title : One Smart Card for Pune Metro and PMP Bus Travel Soon

Web Summary : Pune commuters will soon use a single smart card for Metro and PMP bus travel. The 'One Pune Card' aims to integrate ticketing, simplifying travel across Pune, Pimpri-Chinchwad, and PMRDA regions. Integration work is underway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.