LPG Gas Shortage: गॅस टंचाईमुळे मेसच्या किमतीत ३० रुपयांची वाढ; स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:04 IST2026-03-12T14:04:23+5:302026-03-12T14:04:44+5:30

LPG Gas Crisis: विद्यार्थ्यांसाठी मेस हे रोजचे जेवणाचे मुख्य आधारस्थान असते, मात्र दर वाढल्यामुळे त्यांचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या मासिक बजेटवर झाला आहे

Mess prices increase by Rs 30 due to gas shortage; Competitive exam students hit hardest | LPG Gas Shortage: गॅस टंचाईमुळे मेसच्या किमतीत ३० रुपयांची वाढ; स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका

LPG Gas Shortage: गॅस टंचाईमुळे मेसच्या किमतीत ३० रुपयांची वाढ; स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्ध आणि गॅस पुरवठ्यातील विस्कळीत परिस्थितीमुळे पुण्यातील विद्यार्थ्यांवर थेट परिणाम होत आहे. विशेषत; एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसत आहे. शहरातील मेस, खानावळी आणि स्वस्त जेवण देणाऱ्या भोजनालयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होणे कठीण झाले आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे गॅस पुरवठा कमी झाला असून, सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत सुमारे ११५ ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम जेवणाच्या दरांवर झाला असून अनेक ठिकाणी मेस आणि डब्यांच्या किमतीत २० ते ३० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी मेस हे रोजचे जेवणाचे मुख्य आधारस्थान असते, मात्र दर वाढल्यामुळे त्यांचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या मासिक बजेटवर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा आणि विस्कळीत पुरवठ्याचा फटका आता थेट नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ताटापर्यंत पोहोचला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि बाजारात निर्माण झालेली गॅस टंचाई यामुळे शहरातील मेस आणि खानावळ चालकांनी जेवणाच्या दरात २० ते ३० रुपयांची वाढ केली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सुमारे ११५ ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. गॅससोबतच खाद्यतेल आणि कडधान्यांच्या किमतीही वधारल्याने मेस चालकांना जुन्या दरात जेवण देणे अशक्य झाले आहे. विद्यार्थी आणि नोकरीनिमित्त बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी मेस हा सर्वात सोपा पर्याय असतो. मात्र, आता दर वाढल्यामुळे त्यांच्या मासिक बजेटवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. मेस चालवणारेही या संकटामुळे त्रस्त आहेत. एका मेस चालकाने सांगितले, ‘व्यावसायिक सिलिंडरचे दर सतत वाढत आहेत आणि वेळेवर गॅस मिळत नाही. गॅसचे दर वाढल्यामुळे चढ्या दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे दर वाढवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही.’ विशेष म्हणजे, खाद्यतेल आणि कडधान्यांच्या किमतीतही वाढ झाल्याने मेस चालवणाऱ्यांसाठी जुने दर टिकवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी रोजच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

‘आम्ही गावाकडून मर्यादित पैशांत पुण्यात राहतो. आधीच खोलीचे भाडे, क्लासेस आणि पुस्तकांचा खर्च जास्त आहे. आता मेसचे दर वाढल्यामुळे महिन्याचा खर्च परवडत नाही. काही वेळा आम्हाला एक वेळचे जेवण कमी करावे लागते.’ - सायली कदम, स्पर्धा परीक्षार्थी

पुणे हे शिक्षणाचे केंद्र आहे. हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी येथे वास्तव्यास आहेत. जर गॅस टंचाईमुळे मेस बंद पडल्या किंवा दर वाढले, तर आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ येऊ शकते.’ - नेहा जाधव, स्पर्धा परीक्षार्थी

‘मेस चालकांनी जेवणाच्या किमती वाढवल्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर नाइलाजाने गावी परत जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.’ - आदित्य देशमुख, स्पर्धा परीक्षार्थी
 

 

Web Title : गैस की कमी से मेस की कीमतों में वृद्धि, छात्रों को सबसे अधिक नुकसान

Web Summary : पुणे में गैस की कमी के कारण मेस की कीमतें बढ़ने से छात्रों को, विशेषकर प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी करने वालों को, भारी नुकसान हो रहा है। अंतर्राष्ट्रीय संघर्षों के कारण गैस की कमी से कीमतों में ₹30 की वृद्धि हुई है, जिससे छात्रों के बजट पर दबाव बढ़ गया है।

Web Title : Gas Shortage Hikes Mess Prices, Students Suffer Most in Pune

Web Summary : Pune students, especially those preparing for competitive exams, are hit hard by rising mess costs. Gas shortages, due to international conflicts, have increased prices by ₹30, straining student budgets already burdened by high living expenses.