दिव्यांग मुलीवर तीन वेळा बलात्कार; बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 16:04 IST2023-02-14T16:01:23+5:302023-02-14T16:04:14+5:30

तपासणीनंतर मुलगी 19 आठवडे सहा दिवसांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर

Mentally retarded girl raped three times Shocking incident in Baramati taluka | दिव्यांग मुलीवर तीन वेळा बलात्कार; बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना

दिव्यांग मुलीवर तीन वेळा बलात्कार; बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना

सांगवी (बारामती): पंचवीस वर्षांच्या मतिमंद मुलीवर तीन वेळा बलात्कार करून ती एकोणीस महिन्यांची गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातून समोर आली आहे. याबाबत मुलीच्या आईने माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवराज पोपट खरात (रा.कांबळेश्वर ता. बारामती, जि. पुणे) असे नराधमाचे नाव आहे. तर माळेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी मंगळवार (दि. 14 ) रोजी खरात याला बारामती न्यायालयात हजर केले असता 18 तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे यांनी दिली. मागील पाच महिन्यापूर्वी बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्याच्या हददीतील गावात आरोपीच्या घरात हा प्रकार घडला आहे. मतिमंद मुलीने आईला पोटात दुखत असल्याचे सांगितल्याने उपचारासाठी तिला बारामती महिला रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान डॉक्टरांनी तिच्या तपासणी करून ती 19 आठवडे सहा दिवसांची गरोदर असल्याचे सांगितले.  त्यानंतर मुलीला आईने विश्वासात घेऊन पूर्ण शुद्धीवर असताना झालेल्या प्रकरणाची विचारणा केली. यावेळी घराशेजारी आरोपीने मुलगी घरासमोर खेळत असताना हाताला धरून घरामध्ये नेऊन तिचे इच्छा विरुद्ध 3 वेळा शारीरिक संबंध केले असल्याची माहिती उघडकीस आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Mentally retarded girl raped three times Shocking incident in Baramati taluka