खडकी स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे मेगाब्लॉक; काही लोकल रद्द, तर काही मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्या उशिराने धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:24 IST2025-07-12T19:24:29+5:302025-07-12T19:24:46+5:30
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील लोणावळा-पुणे लोहमार्गावरील खडकी रेल्वे स्थानकावर नवीन फ्लॅटफाॅर्मचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी ...

खडकी स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे मेगाब्लॉक; काही लोकल रद्द, तर काही मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्या उशिराने धावणार
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील लोणावळा-पुणे लोहमार्गावरील खडकी रेल्वे स्थानकावर नवीन फ्लॅटफाॅर्मचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी (दि. १३ जुलै) मध्यरात्री १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ब्लाॅक घेण्यात आला आहे. त्यामुळे या लोहमार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या उशिराने धावतील. तर, पुणे-लोणावळादरम्यान धावणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती पुणे रेल्वे प्रशासनाकडून दिली.
खडकी रेल्वे स्थानकावर प्री-नाॅन इंटरलाॅकिंग आणि नाॅन इंटरलाॅकिंग ही दोन्ही कामे पायाभूत सुविधेसाठी करणे आवश्यक आहे. त्यामुळे या पुणे-लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावरील सुरू असलेली उपनगरीय सेवा (लोकल) रद्द केली आहे. त्यामध्ये २६ उपनगरीय गाड्या रद्द आहेत. तर ट्रेन क्रमांक १११४० होसापेटे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई पुण्यापर्यंतच धावणार आहे. तसेच, ट्रेन क्र. ११०२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई ते कोल्हापूर एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई-पुणेदरम्यान ही सेवा रद्द केली आहे. दरम्यान जोधपूर-हडपसर एक्स्प्रेस, ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस, तिरुअनंतपूरम सेंट्रल ते मुंबई एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस या सर्व गाड्या अर्धा ते दीड तासांपर्यंत रेग्युलेट केले आहे.
खडकी स्टेशनवर या गाड्या थांबणार नाही :
ट्रेन क्र. २२१५८ : चेन्नई -सीएसएमटी, मुंबई
ट्रेन क्र. २२१५७ : सीएसएमटी, मुंबई-चेन्नई
ट्रेन क्र. ११०१० : पुणे-सीएसएमटी एक्स्प्रेस
ट्रेन क्र. २२१६० : चेन्नई सेंट्रल-सीएसएमटी
ट्रेन क्र. ११००७ : सीएमएसटी-पुणे एक्स्प्रेस
ट्रेन क्र. ११८०८ : पुणे-सीएसएमटी एक्स्प्रेस
या गाड्या उशिराने धावतील :
- ट्रेन क्र. २२१५९ : मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस निर्धारीत वेळेच्या एक तास उशिराने सुटेल.
- ट्रेन क्र. ११००८ : पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस निर्धारीत वेळेच्या दीड तास उशिराने सुटेल.
- ट्रेन क्र. १७२२२ : मुंबई ते काकीनाडा एक्स्प्रेस अर्धातास उशिराने सुटेल.
- ट्रेन क्र. १६३३१ : सीएसएमटी ते तिरुवनंतपूरम सेंट्रल त्रिवेंद्रम एक्स्प्रेस दोन तास उशिराने सुटेल.
- ट्रने क्र. २२९४३ : दौंड, पुणे ते इंदौर एक्स्प्रेस दीड तास उशिराने सुटेल.