भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती केली अन् जीवावर बेतलं; मारहाणीत ५७ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू

By नितीश गोवंडे | Published: March 23, 2024 01:44 PM2024-03-23T13:44:09+5:302024-03-23T13:45:47+5:30

हा प्रकार बुधवारी (२० मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास रास्ता पेठेतील ताराचंद हॉस्पिटलच्या गेटसमोर झाला होता...

Mediated and risked his life to settle disputes; A 57-year-old man died in the beating | भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती केली अन् जीवावर बेतलं; मारहाणीत ५७ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू

भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती केली अन् जीवावर बेतलं; मारहाणीत ५७ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू

पुणे : सुरक्षा रक्षकाला चौघे मारहाण करत असताना मध्यस्थी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला देखील मारहाण करण्यात आली. यामध्ये जखमी झाल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी (२० मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास रास्ता पेठेतील ताराचंद हॉस्पिटलच्या गेटसमोर झाला होता. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

धनंजय तिवारी (५७) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत अशोक नर्वदा सिंग (३५, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रसाद नाथा सूर्यवंशी (१८, रा. कसबा पेठ, पुणे), अब्बास सलीम शेख (१९, रा. कसबा पेठ, पुणे), सोमेश प्रताप शिंदे (२९, रा. शिंदे वाडा, कसबा पेठ) आणि शोएब सईद शेख (३४ रा. साईबाबा नगर, कोंढवा) यांच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराचंद हॉस्पिटल समोरील गेटवर भारत सिक्युरिटी कंपनीचे सिक्युरिटी गार्ड अनुप सिंग हा ड्युटी करत होता. त्यावेळी दुचाकीवरून सोमेश आणि यश तेथे आले. त्यांनी त्यांची दुचाकी गेटसमोर उभी केल्याने अनुप सिंग यांनी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने दोघांनी अनुप सिंग याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर सोमेश याने अब्बास, आर्यन, निल्या, प्रसाद व प्रेम साठे यांना तीन दुचाकीवरून घेऊन आला. यानंतर आरोपींनी अनुप सिंग याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली.

त्यावेळी फिर्यादी अशोक सिंग व त्यांचे मालक मयत धनंजय तिवारी हे भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी रस्त्यावरील पीओट ब्लॉक फेकून मारले. यात अनुप सिंग याच्या खांद्याजवळ व अंगावर ओरखडे व मुका मार लागला. धनंजय तिवारी यांना भांडण सोडवत असताना केलेल्या मारहाणीमुळे त्यांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माने करत आहेत.

Web Title: Mediated and risked his life to settle disputes; A 57-year-old man died in the beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.