'मौसम मस्ताना' गाणं म्हणत मागितला किस; पुण्यातील वकिलाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 11:55 IST2022-07-27T11:52:15+5:302022-07-27T11:55:35+5:30

महिला वकिलासोबत अश्लिल चाळे केल्याने आरोपीवर गुन्हा दाखल...

Mausam Mastana song sang Looking at the female lawyer asked for a kiss registered against a lawyer in Pune | 'मौसम मस्ताना' गाणं म्हणत मागितला किस; पुण्यातील वकिलाविरोधात गुन्हा दाखल

'मौसम मस्ताना' गाणं म्हणत मागितला किस; पुण्यातील वकिलाविरोधात गुन्हा दाखल

पुणे: पुण्यात महिला वकिलाकडे पाहून गाणं म्हणणं एका वकिलाला चांगलंच महागात पडले आहे. आपल्या जुनिअर वकिलाच्या विनयभंगाप्रकरणी अॅड. धर्मराज विनायक जाधव (वय. ४०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने केलेल्या आरोपानुसार, जाधव हे फिर्यादीकडे पाहून मौसम मस्ताना है गाणे म्हणत किस मागतले. तसेच आरोपीने फिर्यादीच्या छातीला हात लाऊन मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीकडे पाहून गाणे म्हटले. तसेच तिला स्पर्श करून तिचा विनयभंग केला. आरोपी विनायक जाधवने फिर्यादीकडे किस मागितले त्यास विरोध केला असता फिर्यादीवर जबरदस्ती करत तिच्या अंगाला जाणीवपूर्वक हात लावला. त्याचबरोबर फिर्यादीला आणि तिच्या पतीला आरोपीने मारहाणही केली आहे. 

सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी न्यायालायात बाजू मांडणाऱ्या रक्षकांकडूनच झालेल्या अशा अत्याचाराच्या घटना धक्कादायक आहेत. सोबत काम करणाऱ्या सहकारी महिला वकिलासोबत अश्लिल चाळे केल्याने आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप अटक करण्यात आली नाही. 

Web Title: Mausam Mastana song sang Looking at the female lawyer asked for a kiss registered against a lawyer in Pune