शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

पुण्यातील दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला बुलढाण्याचा जावई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 1:07 PM

तीन कोटींचा मुद्देमाल जप्त..

ठळक मुद्देचारपैकी दोघांना अटक : चार कोटी २० लाखांच्या सोन्याची लूट प्रकरणचारपैकी एक आरोपी राजस्थानातील

पुणे / बुलढाणा : पुण्यातील चंदननगरमधील आयआयएफएल गोल्ड लोनच्या दरोड्याप्रकरणी पुणेपोलिसांनी बुलढाण्यातून एका अधिकाऱ्याचा जावई असलेल्या दीपक विलास जाधव (३२) यास अटक केली असून, त्याच्याकडून आठ किलो ६०० ग्रॅम सोने जप्त केले आहे. दरम्यान, या दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार तोच असल्याचे चंदननगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून, राजस्थानमधील मनीष यादव आणि श्याम नामक दोन आरोपींचा सध्या पुणे पोलीस शोध घेत आहे.पुणे पोलिसांनी बुलढाणा शहर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ७ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री उशिरापर्यंत ही कारवाई केली. दरम्यान, बुलणा येथून पथकाने एमएच २८-एएन- ५०५० क्रमांकाची गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. पुण्यातील चंदन नगर परिसरात आआयएफएल ही गोल्ड लोन कंपनी अर्थात इंडिया इन्फोलीन फायनान्स लिमिटेडमध्ये (आयआयएफएल) ५ डिसेंबर रोजी दरोडा टाकण्यात आला होता. त्यामध्ये तब्बल १२ किलो वजनाचे चार कोटी २० लाख रुपयांचे तारण ठेवलेले सोने बंदुकीच्या धाकावर लुटण्यात आले होते. जवळपास ३९४ पॅकेटमध्ये ते ठेवण्यात आलेले होते. पाच डिसेंबर रोजी बंदुकीच्या धाकावर या आआयएफएलमध्ये दरोडा टाकून हे सोने लुटण्यात आले होते.दरम्यान, त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, स्थानिक पातळीवर मिळालेले सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली कार याची खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर चंदननगर पोलिसांनी बारकाईने विश्लेषण करत चंदननगर पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी बुलढाणा गाठले होते. बुलढाणा शहरातील आरास ले आउटमधील एका व्यक्तीच्या घरी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जात या पथकाने तेथून दीपक विलास जाधव (३२, रा. फ्लॅट नं. ६०९, ज्युबलेन बिल्डिंग, वाघोली, पुणे) यास अटक केली. बुलढाणा येथील कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा दीपक जाधव जावई आहे. दरम्यान, त्याचा एक नातेवाईकही संशयावरून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतला असून, तो वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याची सध्या चौकशी करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी ३ ते सायंकाळी उशिरापर्यंत चंदननगर पोलिसांनी येथे कारवाई करत दीपक जाधवकडून शौचालयात ठेवलेले आठ किलो ६०० ग्रॅम सोने जप्त केले असल्याची माहिती आहे. दरम्यान, पुणे येथील या पथकाने प्रकरणातील दुसऱ्या आरोपीसही औरंगाबाद हद्दीतून अटक केली असून सनी केवल कुमार (२९, रा. ८१२, सतरंजी चौक, लोणार गल्ली, पुणे) असे त्याचे नाव आहे, अशी माहिती एपीआय गजानन जाधव यांनी दिली. .........चारपैकी एक आरोपी राजस्थानातील४आयआयएफएल गोल्ड लोन दरोडा प्रकरणात पोलिसांच्या तपासात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले असून, मनीष यादव नामक आरोपी हा राजस्थानमधील रहिवासी असून, त्याचा एक श्याम नामक साथीदारही आहे. दीपक विलास जाधवने चौकशीत या दोघांची नावे सांगितली असून पुणे पोलीस सध्या त्यांच्या मागावर आहे. दरम्यान, प्रकरणातील चौथा आरोपी सनी केवल कुमार हाही पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे..............................

वाशिमच्याही एकाचीही चौकशीदीपक विलास जाधव याचा जवळचा नातेवाईक असलेल्या वाशिम येथील एकास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का, याचा तपासही चंदननगर पोलीस करत आहे. आतापर्यंतच्या चौकशीत मात्र त्यादृष्टीने काही निष्पन्न झाले नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले. या प्रकरणी आणखी एकाचीही पोलीस चौकशी करीत असल्याची माहिती आहे..............तीन कोटींचा मुद्देमाल जप्तया प्रकरणात पोलिसांनी अताापर्यंत ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १२ किलो सोन्यापैकी आठ किलो ६०० ग्रॅम सोने, गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार एमएच-२८-एएन-५०५० ही ताब्यात घेण्यात आली आहे. उर्वरित मुद्देमालही लवकरच आम्ही हस्तगत करू, असे एपीआय गजानन जाधव यांनी बोलताना सांगितले. चंदनगर पोलीस ठाण्याचे एपीआय गजानन जाधव, अजित धुमाळ, तुषार खराडे, तुषारा अल्हाट, चेतन गायकवाड, कृष्णा बुधवत, सुभाष आव्हाड यांनी बुलढाण्यात कारवाई केली. त्यांना बुलढाणा स्थानिक गुन्हे  शाखेचे दोन कर्मचारी आणि बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या पथकास मदत केली.

टॅग्स :PuneपुणेbuldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी