Video - पुण्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 12:50 IST2021-02-20T12:42:29+5:302021-02-20T12:50:55+5:30

Pune Fire News : सणसवाडी परिसरातील एमआयडीसी मधील सिंटॅक्स या कंपनीत शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली.

massive fire in the Sanaswadi industrial area of Pune | Video - पुण्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग

Video - पुण्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग

पुणे - पुण्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सकाळी 11.30 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील सणसवाडी परिसरातील एमआयडीसी मधील सिंटॅक्स या कंपनीत शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. औद्योगिक वापरासाठी लागणारे प्लास्टिकचे पार्टस तयार करणारी ही कंपनी आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण झालं आहे. आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Web Title: massive fire in the Sanaswadi industrial area of Pune