शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

वनाज परिवार सोसायटीच्या मीटर रूमला भीषण आग; सर्व मीटर जळून खाक, चौघींची बाल्कनीतून उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 10:10 IST

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन चिमुकल्या तसेच एक ज्येष्ठ नागरिक यांना काही प्रमाणात दुखापत झाली आहे

कोथरूड : कोथरूड येथील वनाज परिसरातील वनाज परिवार सोसायटीच्या मीटर रूममध्ये गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण मीटर रूम जळून खाक झाली असून, सोसायटीतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुपारी अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वीज मीटरमधूनच शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीमुळे जवळपास असंख्य मीटर बॉक्स पूर्णतः जळून गेले आहेत. यामुळे सोसायटीतील अनेक घरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला आहे. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येथील दोन चिमुकल्या तसेच एक ज्येष्ठ नागरिक यांना काही प्रमाणात दुखापत झाली आहे. विद्युत उपकरणांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग विझवण्यासाठी परिसरातील नागरिक संजय काळे, दीपक कुल, भाऊसाहेब सातपुते, विशाल उभे,महेश कांबळे, अभिजीत यादव,महेश यादव, संजय खाडे, विकास जाधव, मिलिंद देशपांडे, यांनी अग्निशमन दलांच्या जवान सह आग विझवण्यासाठी मदत केली. यावेळी कोथरूड पोलीस, अग्निशामक दलाचे जवान आणि महावितरणचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून, पुढील तपास सुरु आहे.

दलाच्या जवानांनी प्रथम आग विझवून प्रत्येक मजल्यावरील फ्लॅटमध्ये कोणी अडकलेले आहेत का याचा शोध घेतला. वरील मजल्यावरील काही लोक बाल्कनीमध्ये होते. त्यांना सुरक्षितपने बाहेर काढले. तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधील चौघी जणी आगीला घाबरून दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये उडी मारताना एका मुलीच्या पायाला दुखापत झाल्याचे कळते आहे.

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडPoliceपोलिसfire brigade puneपुणे अग्निशामक दलMONEYपैसाSocialसामाजिक