शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:42 IST

Shashi Tharoor Savarkar Award Controversy: ऑपरेशन सिंदूरवेळी भारत सरकारने पाठविलेल्या डेलिगेशनमध्ये काँग्रेसकडून शशी थरूर यांचे नाव होते. थरूर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांदेशांत जाऊन तिथे भारताने पाकिस्तानवर हल्ला का केला, याची भूमिका मांडली होती. यामुळे थरूर यांना हा पुरस्कार देण्यात येत होता. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी 'एचआरडीएस इंडिया' या स्वयंसेवी संस्थेकडून देण्यात येणारा 'वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५' स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. थरूर यांचे नाव या पुरस्कारासाठी नामित झाल्याची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. 

ऑपरेशन सिंदूरवेळी भारत सरकारने पाठविलेल्या डेलिगेशनमध्ये काँग्रेसकडूनशशी थरूर यांचे नाव होते. थरूर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांदेशांत जाऊन तिथे भारताने पाकिस्तानवर हल्ला का केला, याची भूमिका मांडली होती. यामुळे थरूर यांना हा पुरस्कार देण्यात येत होता. शशी थरूर यांनी हा पुरस्कार नाकारण्यामागे मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या पूर्व सहमतीशिवाय त्यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर करणे हे आहे. थरूर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना या पुरस्काराबद्दलची माहिती माध्यमांमधून कळाली, जेव्हा ते केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात व्यस्त होते.

"पुरस्कारासाठी माझे नाव घोषित करण्यापूर्वी संस्थेने माझ्याशी संपर्क साधून माझी संमती घेणे आवश्यक होते. माझ्या परवानगीशिवाय जाहीर केलेल्या या पुरस्काराचा प्रस्ताव मी स्वीकारू शकत नाही," असे मत थरूर यांनी व्यक्त केले.

पुरस्कारात एकूण ६ जणांना नामांकन

एचआरडीएस इंडियाने एकूण सहा व्यक्तींना या पुरस्कारासाठी नामित केले आहे. दिल्लीमध्ये हा पुरस्कार समारंभ होणार होता. मात्र, पुरस्कार स्वीकारण्यास काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने दिलेला नकार आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने सावरकरांच्या विचारधारेवर टीका करत असल्याने, थरूर यांना हा पुरस्कार जाहीर होणे, आणि त्यानंतर त्यांनी तो त्वरित नाकारणे, याकडे अनेक राजकीय निरीक्षक 'विचारधारेची स्पष्ट भूमिका' म्हणून पाहत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Shashi Tharoor declines Veer Savarkar award, citing lack of consent.

Web Summary : Congress MP Shashi Tharoor refused the Veer Savarkar award from HRDS India, citing the organization's failure to obtain his consent before announcing his nomination. He learned of the award through the media while busy with election work. The award sparked debate due to ideological differences.
टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस