वडकीतील इलेक्ट्रिकलच्या गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 13:02 IST2023-10-15T13:02:24+5:302023-10-15T13:02:41+5:30
इलेक्ट्रिक वस्तूंच्या धुरामुळे तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली

वडकीतील इलेक्ट्रिकलच्या गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
फुरसुंगी : वडकीतील इलेक्ट्रिकलच्या गोडाऊनला आग लागून मशनरी जळून खाक झाल्या. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे सासवड रोड वरील वडकी येथील विजय हॉटेल साई दत्त कॉम्प्लेक्स मध्ये रात्री 11:39 वाजता तळमजल्यावर असणाऱ्या गोडाऊन मध्ये इलेक्ट्रिक साहित्य व मशीनला मोठ्या प्रमाणावर आग लागलेली होती. इलेक्ट्रिक वस्तूंच्या धुरामुळे तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
या ठिकाणी काळेपडळ स्टेशनची फायर गाडी व कोंढवा बुद्रुक स्टेशनची फायर गाडी व फायर ब्राउझर यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात असलेली आग विझवली. गोडाऊन मध्ये असलेल्या इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. यावेळी स्टेशन ऑफिसर अनिल गायकवाड, ड्रायव्हर टिळेकर, फायरमन टिळेकर, मदतनीस जवान शीतकल, गदादे तसेच कोंढवा बुद्रक अग्निशमन केंद्र, फायर गाडी, ड्राइव्हार अरिफ शेख, तांडेल सोपान कांबळे, फायरमन तेजस खरिवले, मदतनीस अभिषेक कसबे, ब्राव्हजर (टँकर ), ड्राइव्हर प्रशांत मखरे, मदतनीस अक्षय चव्हाण यांच्या अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.