Pune | निमगाव-दावडी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गवंडी कामगाराचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 10:16 IST2023-04-17T10:14:18+5:302023-04-17T10:16:44+5:30

जय मल्हार हॉटेलचे शेजारी अज्ञात वाहनाने मयत भालेराव यांना जोराची धडक दिली...

mason worker died on the spot after being hit by an unknown vehicle on Nimgaon-Davadi road | Pune | निमगाव-दावडी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गवंडी कामगाराचा जागीच मृत्यू

Pune | निमगाव-दावडी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गवंडी कामगाराचा जागीच मृत्यू

राजगुरुनगर (पुणे) : दावडी निमगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. लहु तुकाराम भालेराव (वय ४६  रा.गंगापुर खु, ता.आंबेगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ही घटना (दि. १६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत राहुल लहु भालेराव ( रा. गंगापुर ता.आंबेगाव ) याने खेड पोलीस ठाण्यात अपघाताची फिर्याद दिली आहे दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत लहू भालेराव हे गंगापुर (ता. आंबेगाव ) येथून दावडी (ता. खेड ) येथे गवंडी कामासाठी मोटरसायकलवर जात होते. दरम्यान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निमगाव परिसरात खेड ते निमगाव रस्त्यावर जय मल्हार हॉटेलचे शेजारी अज्ञात वाहनाने मयत भालेराव यांना जोराची धडक दिली.

या धडकेत डोक्याला, तोंडाला व हातापायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात चालक हा अपघात ठिकाणी न थांबता पळून गेला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हावलदार मोहन अवघडे करीत आहे.

Web Title: mason worker died on the spot after being hit by an unknown vehicle on Nimgaon-Davadi road