शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या सभांना मार्शल लावणार शिस्त

By admin | Updated: October 22, 2015 03:01 IST

राजदंड पळवणे, तो लपवून ठेवणे, आसन सोडून गोंधळ घालणे, घोषणा देणे, वेळप्रसंगी कागदपत्रे फेकून मारणे आदी प्रकार महापालिकेच्या सभागृहात वाढत चालले आहेत.

पुणे: राजदंड पळवणे, तो लपवून ठेवणे, आसन सोडून गोंधळ घालणे, घोषणा देणे, वेळप्रसंगी कागदपत्रे फेकून मारणे आदी प्रकार महापालिकेच्या सभागृहात वाढत चालले आहेत. अशी दांडगाई करणाऱ्या नगरसेवकांना चाप बसावा यासाठी विधानसभेच्या धर्तीवर मार्शल नियुक्त करण्याची परवानगी महापालिकांना द्यावी, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे सरकारकडे करणार आहे.पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी महापौरांसमोरचा राजदंड पळवून नेला व लपवून ठेवला. मनसेच्याच एका महिला सदस्याने राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ सदस्याबरोबर सभागृहातच असभ्य शब्दात वाद घातला. त्यापूर्वी सेनेच्या एका सदस्याने पिठासीन अधिकाऱ्यांवर कुंडी उगारली होती. महापौरांसमोरील मोकळ्या जागेत जमा होणे, घोषणा देणे, कामकाज बंद पाडणे असे प्रकार तर कायमच होऊ लागलेत. त्यामुळेच सरकारकडे ही मागणी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. पालिका सभांच्या सध्याच्या नियमावलीत कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या सदस्याला सभागृहाबाहेर जा, असे सांगण्याचा अधिकार सभापतींना दिला आहे, मात्र त्या सदस्यांनी ऐकले नाही तर काय करावे, याचा उल्लेख नाही. त्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या धर्तीवर सभागृहातील शिस्तीसाठी मार्शल नियुक्त करण्याचा अधिकार पालिकांना दिला पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. (प्रतिनिधी)