शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 8:35 PM

पती लग्नात राहिलेला हुंडा घेऊन येण्यासाठी पत्नीचा छळ करत होता.

ठळक मुद्देआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : लग्नात न दिलेला हुंडा व क्रेडिटकार्डवर काढलेले कर्ज भरण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन यावेत, यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  मनीषा सिद्धार्थ दहिरे (वय २६,रा. वडगाव बुद्रुक) असे विवाहितेचे नाव आहे. पती सिद्धार्थ ज्ञानोबा दहिरे (वय ३१,रा.वडगाव बुद्रुक) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह एक महिला अशा दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेची आई लता मोरे (वय ४०, रा. चांदणी चौक,  कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना वडगाव बुद्रुक येथील ज्योतिर्लिंग अपार्टमेंटमध्ये मंगळवारी दुपारी घडली. मनीषाचा पती सिद्धार्थ हा लग्न झाल्यापासून लग्नात राहिलेला हुंडा घेऊन येण्यासाठी पत्नीचा छळ करत होता. तसेच घरातील सामान भरण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यास सांगत होता. एवढेच नाही तर पतीने त्याच्या क्रेडिट कार्डवर काढलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन यावेत म्हणून तिचा शारिरीक व मानसिक छळ करत होता. त्यामुळे सतत सासरच्या मंडळीकडून होणाºया त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, पत्नीने गळफास घेतल्यानंतर पतीने याची माहिती पोलिसांना न देता परस्पर महिलेची बॉडी खाली उतरून उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याची माहिती फोनवरून पोलिसांना दिली. पुढील तपास उपनिरीक्षक ए.बी. काळे करीत आहेत.00

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाDeathमृत्यूPoliceपोलिस