Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत भाजपचं पोटात एक अन् ओठात एक; काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 18:03 IST2021-05-14T17:33:24+5:302021-05-14T18:03:36+5:30
मराठा आरक्षणाबाबत भाजप प्रामाणिक नाही....

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत भाजपचं पोटात एक अन् ओठात एक; काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा हल्लाबोल
पुणे : सेव्ह मेरिट ट्रस्ट नावाच्या संघटनेने मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल केली होती. या संघटनेचे नागपूर कनेक्शन उघड झाले असून त्या संघटनांचे सर्वजण भाजपचे पदाधिकारी आहे. त्यामुळे पोटात एक आणि ओठात एक अशी भाजपची मराठा आरक्षणाविषयी भूमिका आहे. मराठा आरक्षणाबाबत भाजप प्रामाणिक नाही असा जोरदार हल्लाबोल काँग्रेसच्यासचिन सावंत यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणाची लढाई सुरू असताना भाजपची भूमिका प्रामाणिक होती का? याचे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी द्यावे असे देखील सावंत म्हणाले.
पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सचिन सावंत म्हणाले, केंद्र सरकारकडून देशपातळीवर पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर नादुरुस्त अवस्थेतील आहे. या संदर्भातील कंपन्या गायब आहेत. हा घोटाळा महाराष्ट्रात उघडकीस आला देशात भयानक स्थिती आहे. व्हेंटिलेटर घोटाळा होणं दुर्दैवी आहे. जेवढे व्हेंटिलेटर पुरवण्यात आले त्याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी देखील सावंत यांनी यावेळी केली. तसेच देशपातळीवर पीएम केअर फंड गोळा करण्यात आला त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच माहिती अधिकारात प्रश्न विचारता येत नाही पण केंद्राने शेवटपर्यंत यावर उत्तर दिली नाहीत.
विनायक मेटे यांच्यावर टीका....
विनायक मेटे यांच्यावर जोरदार टीका करताना सचिन सावंत म्हणाले, मेटे यांनी मराठा आरक्षण स्वतःच्या स्वार्थासाठी वापरलं.ते लोकांना फसवण्यासाठी काहीही करतात. ते मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत.