मराठा समाजास घटनात्मकदृष्ट्या आरक्षणाची गरज, सासवडमधील आंदोलनाचा समारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 02:12 AM2018-11-17T02:12:22+5:302018-11-17T02:13:19+5:30

राजेंद्र कोंढरे : सासवड येथील ठिय्या आंदोलनाचा १०० व्या दिवशी समारोप, संवाद यात्रेस प्रारंभ

The Maratha community, incidentally, needed reservation, and the movement of Sasvad concluded | मराठा समाजास घटनात्मकदृष्ट्या आरक्षणाची गरज, सासवडमधील आंदोलनाचा समारोप

मराठा समाजास घटनात्मकदृष्ट्या आरक्षणाची गरज, सासवडमधील आंदोलनाचा समारोप

Next

सासवड : ‘‘राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातील सर्वोत्तम अनुभवी वकिलांसोबत मराठा आरक्षणाच्या सवैधानिक वस्तुनिष्ठतेवर सखोल अभ्यास करून आरक्षण घटनात्मक करण्याचे प्रयत्न करावेत. न्यायालयात आरक्षणाला आव्हान मिळाले तरी आरक्षण अबाधित राहून त्याचा लवकरात लवकर मराठा समाजास लाभ मिळावा. या सोबतच मराठा समाजाच्या इतर २२ मागण्या विनाअट मंजूर करण्यासाठी सरकारने संपूर्ण तयारी करणे गरजेचे आहे,’’ असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी सासवड येथे व्यक्त केले.

सरकार आणि विरोधकांना मराठा समाजाच्या मागण्यांची आठवण करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा संवाद यात्रा काढण्यात येथे आहेत. १६ नोव्हेंबरपासून सासवड येथील शिवतीर्थावरून ही यात्रा सुरू झाली असून २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत विधानभवनावर धडकणार आहे. सरकारला आरक्षणाच्या निर्णयाचे व इतर मागण्या मान्य करण्यासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक होणार असल्याचे मराठा समाजाच्या वतीने हे संकेत आहेत. मराठा आरक्षणासोबतच कोपर्डी प्रकरणातीलआरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तसेच वसतिगृहांचा प्रलंबित प्रश्न, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सवलतींमधील सावळागोंधळ, मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठी मराठी संवाद यात्रा असून याचा सरकारवर दबाव वाढवणार असल्याचे राज्य समन्वय समितीचे शांताराम कुंजीर यांनी सांगितले. या संवाद यात्रेला राज्य समन्वय समितीचे शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंढरे, डॉ. बुधाजीराव मुळीक, रघुनाथ चित्रे, प्रशांत वांढेकर, नंदकुमार जगताप, सोनुकाका जगताप, स्नेहल काकडे, राजेंद्र जगताप, अजय सावंत, सागर जगताप, संतोष जगताप, संतोष हगवणे आदी पुरंदर तालुका समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

सासवड येथे दि. ९ आॅगस्टपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शिवतीर्थावर ठिय्या आंदोलन सुरू होते. या आंदोलनास १६ नोव्हेंबर रोजी १०० दिवस पूर्ण झाले. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सकारात्मक आल्याने सासवडचे ठिय्या आंदोलनाचे संवाद यात्रेत रूपांतर होऊन त्याची सुरूवात सासवड येथून भगवा झेंडा दाखवून करण्यात आली.
संवाद यात्रेच्या प्रारंभासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सासवड येथे एकवटले होते. ही संवाद यात्रा सासवड येथून निघून शुक्रवारी दुपारी जेजुरी, वाल्हे, नीरामार्गे बारामती येथे सायंकाळी मुक्कामी जाणार असून सायंकाळी बारामती येथे जाहीर सभा होणार आहे.
 

Web Title: The Maratha community, incidentally, needed reservation, and the movement of Sasvad concluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.