Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:22 IST2025-10-01T12:19:22+5:302025-10-01T12:22:02+5:30
Manorama Khedkar News: पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा ट्रकचालक अपहरण प्रकरणात शोध सुरू होता. मनोरमा खेडकरने अटकेच्या भीतीमुळे न्यायालयात धाव घेतली होती.

Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?
Manorama Khedkar Latest News: ट्रकमधील व्यक्तीचं अपहरण करून घरात डांबून ठेवणाऱ्या मनोरमा खेडकरला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मनोरमा खेडकर अपहरण प्रकरणापासून फरार आहे. तिने बेलापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मनोरमा खेडकरला १३ ऑक्टोपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणीत यावर अंतिम निकाल दिला जाणार आहे.
१३ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये मिक्सर ट्रकचा मनोरमा खेडकर यांच्या लॅण्ड क्रूझर गाडीला धक्का बसला होता. या अपघातानंतर खेडकरने ट्रकमधील प्रल्हाद चौहान याला जबरदस्ती कारमध्ये बसवले.
मनोरमा खेडकर त्याला व्यक्तीला पुण्यातील बावधन येथील बंगल्यावर घेऊन गेली. तिथे त्याला डांबून ठेवले होते. रबाळे पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार आली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मनोरमा खेडकरच्या घरातून पोलिसांनी प्रल्हाद चौहानला सोडवले.
मनोरमा खेडकर, पती आणि अंगरक्षकासह फरार
पोलिसांनी अपहरण प्रकरणा मनोरमा खेडकरला नोटीस बजावली होती. पण, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्यानंतर मनोरमा खेडकर, तिचा पती दिलीप खेडकर आणि त्यांचा सुरक्षा रक्षक फरार झाले. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीसही काढण्यात आली होती.
दरम्यान, मनोरमा खेडकरने बेलापूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. मंगळवारी न्यायालयाने मनोरमा खेडकरला अंतरिम जामीन मंजूर केला.