Manoj Jarange Patil: 'मुंबईतल्या बऱ्याच जणांचा माज उतरवण्याचे औषध मराठ्यांजवळ', जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसोबत पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 15:58 IST2024-08-11T15:57:08+5:302024-08-11T15:58:41+5:30
जरांगे पाटलांवर जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत एक मराठा लाख मराठा घोषणा देत मराठा बांधवांनी परिसर दणाणून सोडला

Manoj Jarange Patil: 'मुंबईतल्या बऱ्याच जणांचा माज उतरवण्याचे औषध मराठ्यांजवळ', जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसोबत पुण्यात
कात्रज :प्रचंड गर्दीत मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे कात्रज चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव कात्रज चौकात उपस्थित होते महिलांची संख्या देखील लक्षनीय होती. जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, महाराष्ट्रात मराठे एक नाहीत असे ज्यांनी हीनवले त्यांना पुणेकरांनी दाखवून दिले त्यांची पाठ थोपटायला हवी. दोन चार दिवसापूर्वी आपल्या समाजाला खूप हिनवलं पण पुणेकरांनी एकजूट दाखवून दिली आहे. आरक्षण मिळे पर्यंत मला साथ द्या मागे हटू नका मी हटत नाही अशीच एकजूट दाखवा मला यांनी घेरायचं ठरवलं आहे पण छाताडावर पाय ठेऊन पुढे जाऊ.
मुंबईतल्या बऱ्याच जणांना माज आला आलाय तो माज उतरवयाचे औषध मराठ्यांजवळ आहे. महाराष्ट्रातले जेवढे जेवढे माजलेले वळू आहेत त्यांना कात्रजचा घाट दाखवू, तुमची लेकरं मोठी व्हावीत एवढाच माझा पण आहे माझा जीव गेला तरी मी मागे हटत नाही असे जरांगे पाटील म्हणाले. यावेळी समस्त कात्रज ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे हजारोंच्या संख्येने कात्रज चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळ पासूनच कात्रज व पंच क्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने कात्रज चौकात उपस्थित होते.
कात्रज घाट उतरताच भिलारेवाडी आणि मांगडेवाडी करांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले. पुढे कात्रज चौकात येताच जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली एक मराठा लाख मराठा म्हणतं घोषणांनी परिसर दणाणला. जरांगे पाटलांची शांतता रॅली कात्रज वरून जाणार असल्याने सकाळपासूनच कात्रज चौक व परिसरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हाताला सलाईन लावलेल्या सुया तरीही पाटलांचा उत्साह आणी याच उत्साहात त्यांनी कात्रज करांना संबोधित केले. व पुढे पुणे शहराकडे रवाना झाले.