स्वराज्य संघाच्या अध्यक्षपदी माणिक महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:12 IST2021-09-03T04:12:22+5:302021-09-03T04:12:22+5:30

स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याच्या झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत आध्यात्मिक आघाडीची स्थापना करण्यात आली. आध्यात्मिक आघाडीचे राज्य अध्यक्षपदी हभप माणिक ...

Manik Maharaj as the President of Swarajya Sangh | स्वराज्य संघाच्या अध्यक्षपदी माणिक महाराज

स्वराज्य संघाच्या अध्यक्षपदी माणिक महाराज

स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याच्या झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत आध्यात्मिक आघाडीची स्थापना करण्यात आली. आध्यात्मिक आघाडीचे राज्य अध्यक्षपदी हभप माणिक महाराज मोरे याची निवड करण्यात आली. बैठकीचे अध्यक्ष म्हणून स्वराज्य संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हभप बाजीराव महाराज बांगर हे होते. बाजीराव महाराज बांगर यांनी आध्यात्मिक आघाडीची स्थापना व हभप माणिक महाराज मोरे याची अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली. याला स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे यांनी अनुमोदन दिले. तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष याच्या हस्ते माणिक महाराज मोरे यांना नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले. यावेळी बैठकीला राज्य कार्यकारणीचे सचिव श्यामकांत निघोट, खजिनदार दिलीप हिंगे, संपर्कप्रमुख सचिन उढाणे, कार्याध्यक्ष नामदेव फल्ले, सहसचिव राजेश कान्हूरकर, राज्य विस्तारक सचिन कारले, सोशल मीडिया प्रमुख नीलेश सुकाळे, सहसंपर्कप्रमुख दिलीप पवळे, लेखापरीक्षक रमेश भोसले, कायदेशीर सल्लागार अॅड. किरण झिंझुरके, पुणे जिल्हा अध्यक्ष माऊली आबा कुंजीर उपस्थित होते.

Web Title: Manik Maharaj as the President of Swarajya Sangh