धक्कादायक! पुण्यात तीन वर्षाच्या सावत्र मुलीवर वडिलांनी केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 11:19 IST2018-02-07T11:04:58+5:302018-02-07T11:19:39+5:30

रात्री अकराच्या सुमारास पत्नीला मारहाण करत, तीन वर्षांच्या त्या चिमुरडीला घेऊन बाहेर गेला. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता...

Man arrested in connection with rape of his 3-year-old step-daughter in Warje. | धक्कादायक! पुण्यात तीन वर्षाच्या सावत्र मुलीवर वडिलांनी केला बलात्कार

धक्कादायक! पुण्यात तीन वर्षाच्या सावत्र मुलीवर वडिलांनी केला बलात्कार

पुणे - शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या पुण्यामध्ये तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कर्वेनगरमध्ये सावत्र बापाने अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या आईनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 


वारजे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिमुरडीच्या आईने पतीविरोधात वारजे पोलिसात तक्रार दिली असून, महिला पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके तपास करत आहेत. आरोपी त्या चिमुरडीचा सावत्र बाप असून, त्याने सोमवारी (दि.५) रात्री अकराच्या सुमारास पत्नीला मारहाण करत, तीन वर्षांच्या त्या चिमुरडीला घेऊन बाहेर गेला. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता तो मुलीला घेऊन घरी आला. या वेळी ती मुलगी रडत होती. तिच्या अंगावर, हातापायांवर ओरखडलेले होते. शरीराच्या अनेक भागांतून रक्तस्राव होत होता. त्यामुळे आईने मुलीला कवटाळून, बापाला जाब विचारला असता, त्याने पुन्हा मारहाण केली.

या वेळी आईने मुलीचे निरीक्षण केले असता, तिला काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला. या वेळी आईने चिमुरडीला घेऊन, सरळ कर्वेनगर पोलीस चौकी गाठत झाल्या प्रकाराबाबत सांगितले असता, पोलिसांनी तत्काळ मुलीला उपचारार्थ ससून रुग्णालयात हलवले. त्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी त्या नराधम बापाविरुद्ध बाललैंगिक प्रतिबंधक कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आज त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

Web Title: Man arrested in connection with rape of his 3-year-old step-daughter in Warje.