शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

माळशेज घाट बनला धोकादायक

By admin | Updated: October 27, 2015 00:44 IST

नगर ते कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वरील नगर, ठाणे, पुणे या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला माळशेज घाट अत्यंत अवघड व धोकादायक झाला आहे

मढ : नगर ते कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वरील नगर, ठाणे, पुणे या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला माळशेज घाट अत्यंत अवघड व धोकादायक झाला आहे. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी प्रवासी व वाहनचालकांनी केली आहे. अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांबरोबरच विदर्भ व मराठवाड्यातून मुंबई, कल्याण, ठाणे, भिवंडी, वाशी, नवी मुंबई या भागात जाण्यासाठी हा मार्ग सर्वांत जवळचा व तुलनेने सुरक्षित आहे. वेळ, इंधन व पैसा वाचत असल्याने प्रवासी या मार्गावरून जातात. उन्हाळ्यात डोंगरकडे मोठ्या प्रमाणावर तापतात व पावसाळ्यात या तापलेल्या कड्यांवर पाणी पडले असता ते तडकून मुख्य डोंगरापासून तुटून रस्त्यावर कोसळतात.घाटातील बोगदा ते कल्याण बाजूकडील शेवटचे वळण या अंतरातील डोंगरकडे धोकादायक झाले आहे. त्यांची उंची ही मोठी आहे. ते केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याचे घाटातून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांनी सांगितले. धोकादायक असणारे कडे ताबडतोब काढून टाकणे आवश्यक आहे. प्रसंगी काही कड्यांना पुणे-मुंबई मार्गावरील खंडाळा घाटातील कडे ज्याप्रमाणे तोडण्यात आले तसे पाहणी करून घाटातील धोकादायक डोंगरकडे तोडून घाट सुरक्षित करावा, तसेच आवश्यक तेथे लोखंडी जाळी बसवावी.घाटात रस्ता अतिशय अरुंद व एकेरी मार्गाचा आहे. एका बाजूला उंचच उंच डोंगर व दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यास डोंगरकड्याला वाहन धडकून अथवा खोल दरीत कोसळून भीषण अपघात होण्याची भीती वाहनचालक व्यक्त करतात. पावसाळ्यात दाट धुके व पावसामुळे माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात अरुंद रस्ता व धोकादायक कड्याच्या दुरुस्तीचे काम करता येत नाही. परंतु, आता पाहणी करून माळशेज घाटात धोकादायक डोंगरकडे तोडून काढता येऊ शकतात व संभाव्य धोका टळू शकतो. तरी, माळशेज घाटातील धोकादायक ठिकाणाची, डोंगरकड्यांची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करावी व प्रवासी व वाहनचालकांना भयमुक्त प्रवास करण्यास मदत करावी. (वार्ताहर)