विरोधी तीन पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार कोण ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:29 IST2025-06-18T20:28:44+5:302025-06-18T20:29:50+5:30

तुम्ही मला खुष करा, मी तुम्हाला खुश करतो.पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये माळेगावला देतो,असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना दिले.

malegaon factory election Who is the candidate for the post of chairman of the three opposition panels? Deputy Chief Minister Ajit Pawar's challenge | विरोधी तीन पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार कोण ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान

विरोधी तीन पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार कोण ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान

 माळेगाव - माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी मी माझे नाव जाहीर केले.मात्र निवडणूक लढवणाऱ्या विरोधी तीन पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार कोण आहेत, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुशिष्यांना दिले.

शिरवली येथे श्री निलंकठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.यावेळी पवार पुढे म्हणाले, तुम्ही मला खुष करा, मी तुम्हाला खुश करतो.पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये माळेगावला देतो,असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना दिले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की,खोट बोल पण रेटून बोल अशा पध्दतीने विरोधक आमचेवर आरोप करीत आहेत.कारखान्यावर कर्ज नाही.कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे.



विरोधकांनी त्यांची सत्ता असताना कसा कारभार केला, हे सभासदांना माहीत आहे.त्यांचे काळात कमी रिकव्हरीमुळे साखर उत्पादन कमी झाले.इथेनॉल कमी भावात विकले.पाच वर्षात ८ कोटी युनिट कमी विज तयार झाल्याने ४८ कोटी रुपये नुकसान झाले, याला जबाबदार कोण?माझेवर सहकार बुडवण्याचा आरोप खोटा आहे.सहकार मोडायचा असता तर मी बारामतीतील संस्थांना १२५ कोटी रुपये दिले नसते,असे पवार म्हणाले. कारखान्याला आर्थिक शिस्त लावली जाईल.कारखान्याचा एक हि पैसा न घेता सिएसआर फंडातुन काम केले जाईल,असे पवार यांनी आश्वासन दिले.

- आपण सहकार महर्षी म्हणता आपले कारखान्याच्या स्थापनेत काय योगदान आहे.आता वय झालं आहे.पायजमा ऐवजी लुंगी घालता.आपणास विस्मरण देखील होत आहे असा टोला चंद्रराव तावरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

-  कारखान्याची साखर भिजली हे जर सिध्द केले तर आता निवडणुकीत माघार घेतो.जर सिध्द झाले नाही तर तुम्ही माघार घेणार का? असे आवाहन चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांना अजित पवार यांनी दिले.
 
- चेअरमन म्हणून माझ्यात काम करण्याची धमक आहे.तुमचा प्रपंचात आर्थिक सुबत्ता व संपन्नता आणली जाईल.माझ्याकडे सहकार,कृषी खाते आहे.तुम्हाला हवी ती मदत करतो.माझ्या सारखे काम करण्याची धमक विरोधकांकडे आहे का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.

Web Title: malegaon factory election Who is the candidate for the post of chairman of the three opposition panels? Deputy Chief Minister Ajit Pawar's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.