Malegaon Factory Election Result: माळेगावच्या बिनविरोध निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी केला होता,मध्यस्थीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 21:22 IST2025-06-28T21:17:35+5:302025-06-28T21:22:19+5:30

Malegaon Karkhana Election Result- आपण महायुतीमध्ये एकत्र आहोत, इथही मार्ग काढा, तुम्ही माझ एका,तर तुम्हाला थोडे समजून घ्यावे लागेल.तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात,काहीतरी मार्ग काढा,असे सांगितले.त्यानंतर चर्चा सुरु झाली,मात्र ती निष्फळ ठरली,असा गाैप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

Malegaon Factory Election Result: The Chief Minister had tried to mediate for the unopposed election of Malegaon | Malegaon Factory Election Result: माळेगावच्या बिनविरोध निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी केला होता,मध्यस्थीचा प्रयत्न

Malegaon Factory Election Result: माळेगावच्या बिनविरोध निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी केला होता,मध्यस्थीचा प्रयत्न

Malegaon Karkhana Election Result- माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीबाबत काहीजण मार्ग निघावा या मताचे होते.माझ कोणी कायमचं दुश्मन नाही.कोणी प्रयत्न करतंय का,हे मी पाहत होतो. प्रयत्न होत असल्यास दुधात साखरंच यामध्ये मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, पृथवीराज जाचक यांना चेअरमन करुन तुम्ही ‘छत्रपती’ चा विषय मार्गी लागला,मग माळेगावचा का नाही लावत, आपण महायुतीमध्ये एकत्र आहोत, इथही मार्ग काढा, तुम्ही माझ एका,तर तुम्हाला थोडे समजून घ्यावे लागेल.तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात,काहीतरी मार्ग काढा,असे सांगितले.त्यानंतर चर्चा सुरु झाली,मात्र ती निष्फळ ठरली,असा गाैप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

शिवनगर येथे निळकंठेश्वर पॅनलच्या विजयाबद्दल आयोजित आभार मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.यावेळी पवार म्हणाले,मुख्यमंत्री फडवणीस संबंधितांशी बोलले,त्यावेळी समोरच्यांनी मुख्यमंत्र्यांना, यावेळी हवा आपली आहे,समोरील सगळे पडणार असल्याचे सांगितले.तसेच जाचक यांनी देखील समान जागावाटपाचा माझ्या परस्पर प्रस्ताव दिला. त्यासाठी जाचक यांनी हा प्रस्ताव मान्य न झाल्यास ‘छत्रपती’चे चेअरमन पदाचा राजीनामा देवू असे सांगत ‘चेअरमन’ पद पणाला लावले.पण जाचक यांना देखील हात टेकले. तसेच शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष एस. एन जगताप माझ्याकडे आले होते. त्यांनी सहा जागा द्या असे म्हणाले.

मी त्यांना दोन जागा देतो,असे सांगितल्यावर त्यांनी संमती दर्शवली होती, मात्र त्यांनी पुन्हा काही नावांचा आग्रह धरला.ते नवीन नवीन मुद्दे ते काढू लागले, त्यामुळे मला नाईलाजाने पॅनल घोषित करावा लागला.ज्यावेळी माझ्या लक्षात आले की मला पॅनलच करावा लागेल, त्यावेळीही माझ्या मनात कुठेही मला संचालक किंवा अध्यक्ष व्हायचे नव्हते. सहा ते सात लोक चेअरमन पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधुन तयार होते. त्यामुळे मला माझेच नाव पुढे करावे लागले.माझ्या लक्षात आले,मी कितीही त्यांना पदे दिली की तेवढ्यापुरते दादा दादा करतात,मात्र, पुढार्यांनी काही केले तरी सर्वसामान्य माणुस माझ्या पाठीशी आहे.माळेगांव कारखाना देशातील सर्वेात्कृष्ठ कारखाना म्हणुन नावारुपाला आणु,असा शब्द देतो,असे पवार म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजवर्धन शिंदे यांनी केले .यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष केशवराव जगताप,‘छत्रपती’चे अध्यक्ष पृथवीराज जाचक,बाळासाहेब तावरे,विश्वास देवकाते,तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, सुनील पवार, पृथ्वीराज जाचक,योगेश जगताप,रामदास आटोळे आदी उपस्थित होते.आभार यांनी अविनाश देवकाते मानले
 
अजित पवार यांनी खांडज-शिरवली गटाचे कौतुक केले तसेच माळेगाव गटातील शिवराज राजे जाधव यांचे खास कौतुक केले.अजित पवार म्हणाले मला माळेगाव मधून अनेक स्थानिक नेत्यांनी सांगितले की जाधवराव यांना उमेदवारी देऊ नका परंतु मला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत होती त्यामुळेच मी शिवराज राजे जाधवराव यांचे नाव उमेदवारीसाठी जाहीर केले.

Web Title: Malegaon Factory Election Result: The Chief Minister had tried to mediate for the unopposed election of Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.