शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

खासगी कंपनीकडे नवीन बसची देखभाल : पीएमपीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 2:16 PM

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बस असून त्यापैकी १३७२ बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत.

ठळक मुद्दे नवीन सीएनजी बससाठी प्रयत्न, बसफेऱ्या वाढणार

- राजानंद मोरे - पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या ताफ्यात नव्याने दाखल होणाºया ४०० सीएनजी बसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम खासगी कंपनीकडे देण्याचे विचाराधीन आहे. देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळे बसचे सातत्याने होणारे ब्रेकडाऊन, तांत्रिक बिघाड यामुळे दररोज सुमारे ५ हजार फेºया रद्द होतात. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसानही होत आहे. परिणामी, नवीन येणाऱ्या बसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम खासगी कंपनीकडे दिल्यास बस मार्गावर येण्याचे प्रमाण तुलनेने चांगले राहील, असा विश्वास ‘पीएमपी’तील अधिकारी व्यक्त करत आहेत. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बस असून त्यापैकी १३७२ बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. तर ५७७ बस भाडेतत्वावरील आहेत. पीएमपीच्या मालकीच्या बसच्या देखभाल-दुरुस्तीचे काम आगारांमधील वर्कशॉपमध्ये होत असते. बसचे इंजिन किंवा मोठे काम असल्यास स्वारगेट येथील मध्यवर्ती वर्कशॉपमध्ये बस आणल्या जातात. पीएमपीचे अधिकारी व कर्मचाºयांवर बसच्या दुरूस्तीची जबाबदारी असेत. तर खासगी बसची संपुर्ण देखभाल ठेकेदारांकडेच आहे. मात्र, जुन्या बस, अनेक अप्रशिक्षित कर्मचारी, सुट्ट्या भागांची कमतरता आणि देखभाल-दुरूस्तीमध्ये सातत्य नसल्याने ब्रेकडाऊनवर नियंत्रण मिळविण्यात पीएमपी प्रशासनाला अपयश आले आहे. परिणामी, मार्गावर १४५० ते १५०० बस धावतात. त्यातही दररोज सुमारे १५० बस मार्गावरच बंद पडतात. अनेक शेकडो बस विविध तांत्रिक कारणांमुळे आगारातच उभ्या असतात. प्रशासनाकडून अधिकाधिक बस मार्गावर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. पण हे प्रयत्न सातत्याने फोल ठरत आहेत. एक ते दीड महिन्यातून एका बसला आग लागत आहे. देखभाल-दुरूस्ती योग्यप्रकारे होत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे बस उत्पादक कंपन्यांनीही स्पष्ट केले आहे. यापार्श्वभुमीवर ‘पीएमपी’नेही आता देखभाल-दुरूस्तीचे काम खासगी कंपनीला देण्याचा विचार सुरू केला आहे. पीएमपीच्या ताफ्यात लवकरच नवीन ४०० सीएनजी बस दाखल होणार आहेत. या सर्व बसची देखभाल खासगी कंपनीला देण्याचा प्रस्ताव आहे.पाणी जपून वापरा ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी वरिष्ठ अधिकाºयांसह दिल्लीतील सार्वजनिक बस वाहतुकीची पाहणी केली होती. दिल्लीमधील ९० टक्के बस आगारातील बसच्या देखभालीचे काम खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. त्यामुळे तेथील बस मार्गावर येण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के एवढे आहे. या तुलनेत पीएमपी जवळपासही नाही. यापार्श्वभुमीवर वरिष्ठ अधिकाºयांनी दिल्लीप्रमाणे पुण्यातही हा प्रकल्प हाती घेण्याचा विचार सुरू केला आहे. नवीन येणाºया बस काही ठराविक आगारांमध्येच देऊ़न या आगारांचे देखभालीचे काम खासगी कंपनीकडे सुपुर्द केले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्याने हे आगार आणि अन्य आगारांचा तुलनात्मक अभ्यास केला जाईल. त्यातून परिस्थिती समोर येईल. हे काम कोणत्या कंपनीला द्यायचे, त्याची रचना कशी असेल आदी मुद्यांवर अद्याप निर्णय झालेला नाही........मार्गावर बस येण्याचे प्रमाण कमी आहे. अधिकाधिक बस मार्गावर येण्यासाठी देखभाल-दुरूस्ती चांगल्या पध्दतीने व्हायला हवी. आपली यंत्रणा तेवढी सक्षम नाही. बसही खुप जुन्या आहेत. त्यासाठी खासगी कंपनीला नवीन बसच्या देखभालीचे काम देण्याचा विचार आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. - नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीखडकवासला धरण साखळी प्रकल्पात केवळ ३.८९ अब्ज घनफूट (१३.३३ टक्के) पाणीसाठा आहे. धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांकडून दुष्काळाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर, या तक्रारींची नोंद घेण्यासाठी दुष्काळ निवारण समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची दुष्काळ नियंत्रण समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रारीसाठी नागरिकांनी ०२०-२६१२२११४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे..............................

 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे