शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांचा दर्जा चांगला राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:10 IST

-- बारामती : अगदी पहाटेच्या वेळी अधिकाऱ्यांचा फौजफाटा सोबत घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील विविध विकास कामांची ...

--

बारामती : अगदी पहाटेच्या वेळी अधिकाऱ्यांचा फौजफाटा सोबत घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी ‘विकासकामांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्या. सर्व कामे वेळेत पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि. २५) कऱ्हा नदी सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत दशक्रिया विधी घाट, एसटी स्टॅन्डचे नवीन बांधकाम व परकाळे बंगला येथील कॅनलवरील सुशोभीकरण कामाची पाहणी केली. विकास कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सर्व विभागांनी विकास कामे समन्वयाने पार पाडावीत. निधीचा योग्य पद्धतीने वापर करावा. निधीची आवश्यकता असल्यास संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करावेत. सार्वजनिक कामे चांगली व वेळेत होणे अपेक्षित आहेत. अपूर्ण कामांबाबत संबंधित विभागाने माहिती घेऊन ती वेळेवर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. शहरातील रस्त्यावरील खड्डे लवकर भरून घ्यावेत. सर्वच विभागांनी जबाबदारी स्वीकारून कामे करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, गटनेता सचिन सातव, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पावडे, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अनिल बागल, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपअभियंता राहुल पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आदी उपस्थित होते.

---------------------------

बारामती नगरपरिषद इमारतीवरील सोलर प्रकल्पाचे उद्घाटन

जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० अंतर्गत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अपारंपरिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत बारामती नगर परिषद इमारत येथे आस्थापित केलेल्या सौर विद्युत संचाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पौर्णिमा तावरे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, सभापती बांधकाम समिती सत्यवान काळे, नगरपरिषदेचे सदस्य, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते. या सोलर प्रकल्पात एकूण १७९ पॅनल असून त्याची क्षमता ६० के.व्हीची आहे. हा एक चांगला प्रकल्प असून या प्रकल्पामुळे वीज बील कमी येण्यास मदत होईल. नगरपरिषद इमारतीत स्वच्छता असायला हवी. परिसर सुंदर आणि नीटनेटका दिसला पाहिजे. परिसरात अनधिकृत होर्डिंग असल्यास काढून टाकावीत, असेही ते यावेळी म्हणाले. हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सहकार्य केलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

--------------------------------

फोटो ओळी : अगदी पहाटेच्या वेळी अधिकाऱ्यांचा फौजफाटा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात सुरू असणाऱ्या क-हा नदी सुधार प्रकल्पाची पाहणी केली.

२५०९२०२१-बारामती-०७

------------------------------