शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाजवळील दारूअड्डा गायब

By admin | Updated: February 23, 2015 00:22 IST

शहरात ठिकठिकाणी खुलेआम होत असलेली बेकायदा दारूविक्री यावर आधारित ‘बिनधास्त ढोसा अड्ड्यावर दारू’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची

पिंपरी : शहरात ठिकठिकाणी खुलेआम होत असलेली बेकायदा दारूविक्री यावर आधारित ‘बिनधास्त ढोसा अड्ड्यावर दारू’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची रविवारी शहरभर चर्चा होती. दारूविक्रेत्यांसह पोलिसांनी या वृत्ताची धास्ती घेतल्याने चिखली, स्पाईन रोडवरील घरकुल प्रकल्पाजवळ खुलेआम सुरू असलेला दारुअड्डा रविवारी अचानक गायब झाला. चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, भोसरी उड्डाणपूल, निगडी, कुदळवाडी रस्ता, पूर्णानगर यासह शहरभर तळीरामांचे अड्डे सुरू आहेत. चायनीज पदार्थांच्या स्टॉलच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदारीत्या दारूविक्री सुरू आहे. याकडे पोलिसांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असून, त्याबाबतचे सचित्र ‘स्टिंग आॅपरेशन’ लोकमतच्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध झाले. शहरात दिवसभर या वृत्ताची चर्चा होती. खुलेआम सुरू असलेल्या दारूविक्रीबाबत अनेक नागरिकांनी संताप व्यक्त करीत पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत नाराजी व्यक्त केली. रविवारी सकाळीच येऊन पोलिसांनी येऊन हा अड्डा बंद केल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, कारवाईबाबत निगडी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलिसांनी कानावर हात ठेवले. शहरातील चायनीज हातगाड्यांवरील दारूविक्री बंद झाली; तसेच रस्त्यावर खुलेआम बसणारे तळीराम नजरेस पडत नव्हते. (प्रतिनिधी)