शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

‘कार्बन न्यूट्रल’च्या दिशेने महर्षी कर्वे शिक्षण संस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 2:26 PM

दररोजच्या घडामोडीमधून कमीत कमी कार्बन उत्सर्जन कसे करता येईल, यावर उपाययोजना

ठळक मुद्देकॅम्पसचे केले कार्बन ऑडिट : उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू मोबाईल, डेस्कटॉप, संगणक, टीव्ही, म्युझिक प्लेअर, डीव्हीडी प्लेअर, प्रिंटर आदी वस्तूंचा समावेशकॅम्पसमध्ये सर्वाधिक कार्बन डायॉक्साइड विजेच्या वापरातून निर्माण होत असल्याचे समोर

श्रीकिशन काळे - 

पुणे : पुणे शहराला २०३० पर्यंत ' कार्बन न्यूट्रल ' शहर बनविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच आता महाविद्यालयांनीदेखील त्यात सहभाग घेऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पुढाकार घेऊन अंमलबजावणी केली आहे. अशाच प्रकारे इतर महाविद्यालयांनीदेखील उपक्रम राबविल्यास पुणे न्यूट्रलकडे वाटचाल करू शकणार आहे. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत हा उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी सुरूवातीला कॅम्पसमध्ये किती कार्बन उत्सर्जन होते, त्याचे ऑडिट करण्यात आले. यावर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्टच्या फॅकल्टी प्रा. प्राजक्ता दलाल-कुलकर्णी आणि मास्टर ऑफ आर्किटेक्ट पर्यावरणाच्या विद्यार्थी ऐश्वर्या शेंडगे यांनी काम केले. दररोजच्या घडामोडीमधून कमीत कमी कार्बन उत्सर्जन कसे करता येईल, यावर अगोदर उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. 

संस्थेच्या बाया कर्वे हॉस्टेल, रमा सदन हॉस्टेल, सर ससून हॉस्टेल, कमिन्स कॉलेज, भानुबेन नानावटी कॉलेज, एमबीए कॉलेज आणि सिद्धीविनायक कॉलेजमध्ये किती ऊर्जा लागते, त्याचे आॅडिट काढण्यात आले. त्यानुसार कुठे ही ऊर्जा कमी करून सौरऊर्जा किंवा इतर उपाय करता येतील, यासाठी प्रयत्न करण्यात आले. इंधन, वीज, पाणी, वेस्ट आदींबाबतही माहिती संकलित करण्यात आली. कॅम्पसमधील ई-वेस्टसुद्धा काय निर्माण होते आणि त्याचा वापर कसा करता येऊ शकतो, यावर उपाय करणे सुरू केले. ........विजेचा वापर करणार कमी संपूर्ण कॅम्पस ३४ एकरांत वसलेला आहे. सर्वप्रथम इंधनाचा वापर कमी करण्यावर भर देण्याचे ठरले. विजेचा कमी वापर करायचा आणि एकमेकांच्या मदतीने उपाय करता येतील, यावर चर्चा केली. प्रत्येकाने यात वाटा उचलणे आवश्यक होते. त्यामुळे सर्वांना याबाबत माहिती देण्यात आली.......तुमचे ई-वेस्ट द्या आम्हाला ! कॅम्पसमध्ये ई-वेस्ट संकलित करण्यासाठी उपक्रम राबविला जातो. त्यात विद्यार्थ्यांनी आपले ई-वेस्ट दान करायचे किंवा त्याचा पुनर्वापर करायचे. यात मोबाईल फोन, डेस्कटॉप, संगणक, टीव्ही, म्युझिक प्लेअर, डीव्हीडी प्लेअर, प्रिंटर आदी वस्तूंचा समावेश आहे. यामुळे नवीन काही करायचे असेल, तर त्यासाठी यातील वस्तू वापरून उपक्रम करता येईल आणि नवी वस्तू घ्यायची गरज पडणार नाही, असा उपक्रम आहे. ..............कॅम्पसमध्ये सर्वाधिक कार्बन डायॉक्साइड विजेच्या वापरातून निर्माण होत असल्याचे समोर आले. तसेच वाहतूकव्यवस्थेचाही त्यात समावेश होता. यावर उपाय म्हणून कमी विजेचा वापर करणारी उपकरणे बसविणे, सौरऊर्जेचा वापर करणे, सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करणे, इलेक्ट्रिक गाडीचा वापर करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. - प्रा. प्राजक्ता दलाल-कुलकर्णी,कार्यक्रम समन्वयक ................. 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय