शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल अविरत ठेवावी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:10 IST

ऊर्मिला मातोंडकर : प्रबोधन शतकोत्सव महोत्सवाचे उद्घाटन ऊर्मिला मातोंडकर : ‘प्रबोधन’चा शतकोत्सव लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “प्रबोधन या ...

ऊर्मिला मातोंडकर : प्रबोधन शतकोत्सव महोत्सवाचे उद्घाटन

ऊर्मिला मातोंडकर : ‘प्रबोधन’चा शतकोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “प्रबोधन या शब्दाचा अर्थ आज दुर्दैवाने चुकीच्या अर्थाने वापरला जातो. मानसिक उद्बोधन म्हणजे प्रबोधन. यातून होणारी क्रांती असत्यावर, अन्यायावर घाव घालणारी असते. प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा वसा बाळगत तरुणाईला पुरोगामी महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल अविरत सुरू ठेवावी लागेल,” असे विचार अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केले

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सव घेण्यात आला. महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. २१) झाले. त्यावेळी मातोंडकर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया, सीमा चोरडिया, संवाद पुणेचे सुनील महाजन, सचिन ईटकर, निकिता मोघे, किरण साळी, हरीश केंची आदी यावेळी उपस्थित होते.

आयुष्य कधीतरी सुवर्णसंधी देते, तर कधी निराशेच्या गर्तेत फेकते. यातून बाहेर कसे पडायचे, हे ‘माझी जीवनगाथा’ शिकवते. प्रबोधनकारांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, असे मातोंडकर यांनी सांगितले. डॉ. आढाव म्हणाले, “फुले-शाहू-आंबेडकर, सावित्रीच्या लेकी हे धागे म्हणजे एक विचारधारा आहे. विचारधारेतील धागे काळाच्या ओघात सुटता कामा नयेत. त्यासाठी प्रबोधनकारांच्या विचारांची गरज आहे. प्रबोधनकार हे सत्यशोधक होते.”

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेनेचे हिंदुत्व चातुर्वण्य व्यवस्थेचे समर्थन करणारे नाही; ते हिंदुत्व प्रबोधनकारी आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जाजवल्य आणि प्रखर विचारांना विविध प्रकारे धुमारे फुटत असतात. प्रबोधनाच्या जाणिवांचा नवा हुंकार निर्माण होण्याची गरज आहे.” स्वेच्छा विवाहाचा विषय अजूनही आपल्या समाजाने स्वीकारलेला नाही. त्यातून ‘ऑनरकिलिंग’च्या भयानक घटना घडतात. डिजिटल युगात अंधश्रद्धा, जातीयता नव्या मुखवट्यातून परत समोर येत आहेत. त्याचा सामना विचारांनी करायला हवा, याकडे डॉ. गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले.