Sharad Pawar: "दोन्ही डोळे बंद ठेवले तर महाराष्ट्राचं नुकसान..." शरद पवारांची तुफान फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 17:26 IST2023-02-18T17:24:25+5:302023-02-18T17:26:13+5:30
दापूर शहरातील एका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते....

Sharad Pawar: "दोन्ही डोळे बंद ठेवले तर महाराष्ट्राचं नुकसान..." शरद पवारांची तुफान फटकेबाजी
पुणे : मला आता सर्वकाही व्यवस्थित दिसतंय, त्यामुळे कोण काय करतंय हे सांगायची आणि माहिती घ्यायची गरज पडत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते इंदापूर शहरातील एका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी तुफान फटकेबाजी केली.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, काही महिन्यांपूर्वी माझ्या दोन्ही डोळ्यांना दिसण्यासंदर्भात प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी मी डॉक्टरांना भेटल्यावर त्यांनी सांगितले की, दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करायची गरज आहे. मी त्यांना म्हटलं आत्ताच करून टाका. पण डॉक्टर म्हणाले एकदम तुमच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करता येणार नाही. जर तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवले तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगले होणार नाही. त्यामुळे तुमचा एक तरी डोळा उघडा ठेवला पाहिजे. पवारांच्या या शाब्दिक फटकेबाजीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.