‘आयएमए’च्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:14 IST2021-09-04T04:14:06+5:302021-09-04T04:14:06+5:30

बारामती : येथील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. अविनाश आटोळे यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी नुकतीच ...

As the Maharashtra Vice President of IMA | ‘आयएमए’च्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी

‘आयएमए’च्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी

बारामती : येथील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. अविनाश आटोळे यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

डॉ. अविनाश आटोळे गेली सोळा वर्षे बारामतीत वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी आयएमएच्या बारामती शाखेत सचिव व खजिनदार म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये बारामतीत आईडीकॉन, मॅस्टॅकॉन अशा कार्यशाळा संपन्न झाल्या आहेत. राज्यस्तरीय डॉक्टरांच्या महास्पोर्ट्स या क्रीड स्पर्धांचे बारामतीत आयोजन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आयएमएच्या राज्य अॅकेडमी मेडिकल स्पेशालिस्टच्या उपाध्यक्षपदीही त्यांनी याअगोदर काम केलेले आहे. त्यांच्या निवडीसाठी डॉ. अशोक तांबे, डॉ. अमरसिंह पवार, डॉ. एम. आर. दोशी, डॉ. राजेंद्र मुथा यांचे विशेष साहाय्य झाले.

०३०९२०२१ बारामती—०१

Web Title: As the Maharashtra Vice President of IMA