शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

Maharashtra Election 2019 : पुण्यातील लोकांनी लावली मुंडे कुटुंबात भांडणे : पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 12:24 PM

२४ ऑक्टोबरला राष्ट्रवादीचे घड्याळ कायमस्वरुपी बंद पडेल

ठळक मुद्दे माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची रविवारी (दि. १३) सहकारनगर येथील वाळवेकर लॉन्स येथे जाहीर सभा

पुणे : मुंडेसाहेबांचे पुण्याशी, येथील अनेक कुटुंबांशी, मिसाळ परिवारासोबत घरगुती स्वरुपाचे नाते होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी ही नाती, त्यांचा वसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु याच पुण्यातील काही लोकांनी आमच्या कुटुंबात भांडणे लावून दिली. स्वत:च्या जिल्ह्यात बारामती, आंबेगाव वगळता एकही जागा जिंकता आली नसताना बीडची धास्ती कशासाठी घेता, असा उपरोधिक टोला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार, अजित पवार यांना लगावला. तसेच येत्या २४ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनी कायमस्वरुपी बंद पडेल, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केला.पर्वती विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी रविवारी (दि. १३) सहकारनगर येथील वाळवेकर लॉन्स येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. सभेसाठी पर्वतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले,  युवानेत्या स्वरदा बापट, शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओस्तवाल, महेश लडकत, स्मिता वस्ते, राजेंद्र शिळीमकर, प्रवीण चोरबेले, दिसा माने, महेश वाबळे उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या, की पुण्यात इतकी वर्षे सत्ता असताना काँगे्रस- राष्ट्रवादी काँगे्रसने विकास का केला नाही. परंतु भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेवर आल्यानंतर मेट्रो, स्मार्ट सिटीसारखे विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेतले. राज्यात मुंबईनंतर सर्वात मोठे व महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्याच्या विकासाला गती  देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाच्या मुद्द्यांना महत्त्व दिले. पक्षाचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘सबका साथ, सबका विकास’ आम्ही सर्व कार्यकर्ते स्थानिक पातळीवर काम करत आहोत. यामुळेच पुण्यात आणि राज्यात भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांना नागरिक प्रचंड मतांनी निवडून देतील आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे घड्याळ कायमस्वरुपी बंद पाडतील, असा विश्वास मुंडे यांनी येथे व्यक्त केला. मिसाळ म्हणाल्या, की मुंडेसाहेबांमुळे मी राजकारणात आले. महापालिका असो की आमदारकीची निवडणूक मुंडेसाहेबांच्या आदेशामुळे आणि  विश्वासामुळे लढवली आणि निवडूनदेखील आले. जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा साहेबांनी माझ्यासाठी एक तरी सभा घेतली. तसेच प्रत्येक निवडणूक साहेब दररोज फोन करून प्रचार कसा सुरू आहे, काही अडचण नाही ना याची चौकशी करत. ...........मैत्रिणीसाठी खास सभा : साहेबांनंतरही हे नाते अतूट..मुंडेसाहेबांचे बाबा मिसाळ, सतीश मिसाळ यांच्यासोबत मैत्रीपूर्ण व घरगुती स्वरुपाचे नाते होते. साहेबांनंतर हे नाते आम्हीदेखील पुढे नेले आहे. ४माधुरीताई आणि माझ्या वयामध्ये अंतर असले तरी आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत. साहेब माधुरीताईसाठी एक तरी सभा घेत आणि म्हणूनच मीदेखील केवळ माझ्या मैत्रिणीसाठी ही खास सभा घेतली. ४माधुरीताई पक्षाच्या अध्यक्षा झाल्यानंतर आमदारकीच्या तिकिटाबाबत अनेक अफवा उठल्या होत्या. परंतु त्यांची मैत्रीण पक्षाच्या कोर कमिटीमध्ये असल्यावर कोण तिकीट कापणार, असेदेखील पंकजा मुंडे यांनी येथे सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेPankaja Mundeपंकजा मुंडेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMadhuri Misalमाधुरी मिसाळElectionनिवडणूक