शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यातील जवळपास 400 नागरिकांनी " या "कारणामुळे टाकला मतदानावर बहिष्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 14:06 IST

Pune Election 2019 : उमेदवार फिरकलेच नाहीत

ठळक मुद्देकसलीही मदत न मिळाल्याने मतदान न करण्याचा निर्णय

पुणे : आंबील ओढयाला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या आणि सात जणांचा बळी गेलेल्या टांगेवाला कॉलनीमधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. मतदानाच्या दिवशी येथील नागरिकांनी मतदान केले की नाही याची पाहणी करीत 'लोकमत'ने नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी एकही उमेदवार प्रचारासाठी अगर मदतीसाठी फिरकला नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला असून मदत न मिळाल्याने मतदान न करण्यावर आम्ही ठाम असल्याचे सांगितले.आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पुण्यात वीस पेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तीन ते साडेतीन हजार वाहनांचे नुकसान झाले होते. सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ मिश्रित पाणी घुसले होते. अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये अद्यापही गाळ साठलेला आहे. टांगेवाला कॉलनी, मोरे वस्ती, तावरे कॉलनी, मल्हार वसाहतीमध्ये तर पुराने कहर केला होता. टांगेवाला कॉलनिमधील अनेक घरे पडली होती. येथील सात जणांचा अंगावर भिंत पडल्याने तसेच वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. अजूनही या घरांची डागडुजी झालेली नाही. बहुतांश नागरिक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहात आहेत. अनेकांना शासकीय कागदपत्रे आणि मदत मिळालेली नाही. जी मदत मिळाली ती तुटपुंजी आहे. याकडे प्रशासन, आमदार, खासदार आणि स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.  त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही नागरिक या निर्णयावर ठाम असल्याचे दिसुन आले. प्रशासन आणि सर्वपक्षीय उमेदवारांबद्दल प्रचंड चीड नागरिकांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. याठिकाणी एकूण 80 ते 85 घरे असून 400 च्या आसपास मतदार आहेत. आमची आणि आमच्या मताची किंमत तुम्हाला नसेल तर आम्हालाही तुम्हाला मतदान करायचे नाही असे खडे बोल नागरिक ऐकवीत आहेत. उमेदवारांनी तर प्रचारादरम्यान या भागात येणे टाळले. त्यांनी बाहेरून बाहेरूनच पळ लढल्याचा आरोप शेरु शेख, संजय शिंदे, नंदा शिंदे, अजीज शेख, चंदन भोंडेकर, कैलाश शिंदे, शैलेश चव्हाण, महंमद किरसुल, रेहाना शेख यांनी केला.

 

टॅग्स :PuneपुणेVotingमतदानMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parvati-acपर्वती