शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

Maharashtra Election 2019 : बारामतीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांचा अर्ज दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 12:59 PM

बारामती विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

ठळक मुद्देबारामती विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीच्या चौकाचौकात पवार यांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने बारामती विधानसभा नेहमीच राज्यात लक्षवेधी ठरतो.

पुणे - बारामती विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून मिरवणुकीची सुरुवात झाली. तिथून गुणवडी चौक, इंदापूर चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बारामती येथील प्रशासकीय भवन येथे अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा पार्थ आणि जय यांनीही सहभाग घेतला होता.

बारामतीच्या चौकाचौकात पवार यांचे स्वागत करण्यात आले. बारामती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापुर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे चर्चेत आला आहे. शुक्रवारी (4 ऑक्टोबर) अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी पवार यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पवार यांच्या स्वागतासाठी  समर्थक नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी चक्क 500 किलोचा पुष्पहार तयार केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने बारामती विधानसभा नेहमीच राज्यात लक्षवेधी ठरतो. राज्यात सर्वाधिक चर्चा याच मतदारसंघाची होते. आजपासुन ही चर्चा अधिक रंगणार आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पवार यांच्यासह भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या प्रचाराचा शुभारंभ देखील होणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे.

भाजपाचे मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत केला होता. तर अजित पवारांनी खडसे कोणाच्याही संपर्कात नव्हते, माझ्या आणि जयंत पाटील यांच्याही नाही, असं सांगितलं. त्यामुळे पवार काका-पुतण्यांच्या विधानांमध्येच विसंगती असल्याचं समोर आलं आहे.अजित पवार म्हणाले की, भाजपाने कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांचा आहे. राजकीय कार्यकर्ता म्हणून मीही बुचकळ्यात पडलो, विनोद तावडे, प्रकाश मेहता असतील किंवा खडसे, बावनकुळे यांना उमेदवारी नाकारतील, असं मलाही वाटलं नव्हतं. खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हते, मी काल सकाळपासून मुंबईतल्या राष्ट्रवादी भवनमध्ये बसलो होतो. त्यावेळी मीच काही चॅनलवर पाहिलं की अजित पवार हेलिकॉप्टरमध्ये बसले. अजित पवारांचं हेलिकॉप्टर आता जळगावला रवाना झालंय. अजित पवारांनी बीडचा हेलिकॉप्टरचा दौरा रद्द केला नि जळगावचा दौरा सुरू केला, पण असं काहीही झालेलं नव्हतं.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019baramati-acबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस