शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

Maharashtra CM : राजकीय भूकंपाचे सोशल मीडियावर हादरे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 20:13 IST

‘चिटिंग करताय तू...बेचारा सो रहा था मैं सपने देख रहा थे मैं’ अशा पोस्टमधून शिवसेनेच्या जखमेवरही  मीठ चोळण्यात आले....

पुणे : महाराष्ट्रात गनिमी काव्याने देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी सत्ता स्थापन करण्याच्या राजकीय भूकंपाने शनिवारी राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शिवसेनेला चांगलाच हादरा दिला. या घडामोडीचे पडसाद सोशल मीडियावर उमटले नसते तरच नवल! एकीकडे ‘मी पुन्हा येईन’ असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान होण्यावर समर्थकांनी आनंद व्यक्त केला असला तरी दुसरीकडे राष्ट्रवादी बरोबर घरोबा केल्याने  ‘पारदर्शक भ्रष्टाचार’ असे म्हणत नेटिझन्सनी नाराजीचा सूरही आळविला आहे. अनेकांना  ‘ये बात कुछ हजम नहीं हुई’ असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्याचा केविलपणा प्रयत्न काहीअंशी यशस्वी होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच सकाळी सकाळीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची बातमी येऊन थडकली आणि अनेकांची झोप उडाली. सकाळी आठ वाजल्यापासूनच सोशल मीडियावर नेटिझनसच्या पोस्ट झळकू लागल्या. ’शपथविधी होता का? दशक्रियाविधी. एवढ्या सकाळी सकाळी आटोपला’ अशा शब्दात या घटनेची खिल्ली उडविण्यात आली. ‘भंडारा चल रहा था, अंदर गए तो हलवा खतम, बहार आए तो चप्पल गायब’,  ‘चिटिंग करताय तू...बेचारा सो रहा था मैं सपने देख रहा थे मैं’ अशा पोस्टमधून शिवसेनेच्या जखमेवरही  मीठ चोळण्यात आले. ’ पळून जाऊन राजभवनात दोघांचे लग्न’ अशा आशयाखाली नवरदेव देवेंद्र आणि वधू अजितदादा तर राज्यपाल भटजी अशा कल्पकतेच्या पोस्टमधून अनेकांचे मनोरंजन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांकडे हात दाखवत म्हणत आहेत  ‘हे कधी काय करेल काही सांगता येत नाही’ हे सूचक विधानही खूपकाही सांगून गेले. ’पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात शेती प्रश्नांवर जी एक तास चर्चा झाली, त्याचेचं पीक आज आलेले आहे’ असा टोलाही लगावण्यात नेटिझन्स मागे नव्हते. माध्यमांना मिळालेल्या खात्रीलायक सूत्रांनुसार हा शब्द इतका परवलीचा झाला आहे की नेटिझन्सनी त्याच्यावरही तोंडसुख घेत  ‘अखेर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सूत्राला ही माहिती नव्हती’ अशा मेसेजमधून माध्यमांनाही लक्ष्य केले. अजित पवारांच्या बंडखोरीचे समर्थन , सुप्रिया सुळे यांचे ‘पार्टी आणि फँमिलीमध्ये फूट’ असे स्टेटस यांचीही चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुद्धधीबळ खळेत आहेत आणि पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यावर हात ठेवला आहे हे अत्यंत ‘मार्मिक’ व्यंगचित्र ’बोलके’ठरले. 

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस