Maharashtra Bandh : पीएमपीवर झालेल्या दगडफेकीमुळे सेवा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 17:39 IST2018-08-09T17:37:09+5:302018-08-09T17:39:58+5:30
पीएमपीच्या 5 बसेसला अांदाेलकांनी लक्ष केल्याने सकाळी 10 नंतर पीएमपीची सेवा पूर्णतः बंद करण्यात अाली.

Maharashtra Bandh : पीएमपीवर झालेल्या दगडफेकीमुळे सेवा बंद
पुणे : मराठा क्रांती माेर्चातर्फे अाज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली हाेती. पीएमपी प्रशासनाकडून खबरदारी म्हणून काही मार्गांवरील बससेवा बंद ठेवण्यात अाली हाेती. सकाळी 10 वाजेपर्यंत 686 बसेस मार्गावर साेडण्यात अाल्या हाेत्या. अांदाेलनाची तीव्रता वाढल्याने त्यानंतर सर्व बसेस बंद करण्यात अाल्या. विविध पाच ठिकाणी बसेसवर झालेल्या दगडफेकीत पीएमपीचे 60 हजारांचे नुकसान झाले. तर सकाळच्यावेळी 750 बसेस मार्गावर साेडता न अाल्याने पीएमपीचे अंदाजे 75 लाखांचे उत्पन्न बुडाले.
पुण्यात महाराष्ट्र बंदला सकाळपासूनच सुरुवात झाली. पुण्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात अाले हाेते. पीएमपीकडून सकाळच्यावेळी सेवा पुरविण्यात अाली. सकाळी 10 नंतर बसेसवर दगडफेक झाल्याने संपूर्ण बससेवा बंद करण्यात अाली. सर्व बस स्थानकांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत हाेता. पीएमपीसेवा बंद झाल्याने बाहेरगावावरुन अालेल्या नागरिकांचे माेठे हाल झाले. त्याचबराेबर ज्यांची कार्यालये सुरु हाेती त्यांना घरी परतताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरराेज पीएमपीच्या 1450 हून अधिक फेऱ्या हाेत असतात परंतु अाज सकाळच्या वेळेत केवळ 686 इतक्याच बस रस्त्यावर धावू शकल्या. अांदाेलनावेळी पीएमपीला लक्ष केले जात असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाकडून बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात अाला.
दरम्यान संध्याकाळी 5 पर्यंत शहरातील वातावरण निवळले नसल्याने बससेवा बंद ठेवण्यात अाली हाेती. तसेच पुढेही बससेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे.