Maharashtra Bandh : अारक्षणाच्या मागणीसाठी रक्तदान करुन अांदाेलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 21:01 IST2018-08-09T20:59:26+5:302018-08-09T21:01:59+5:30
अारक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकार्यालयाच्या जवळ रक्तदान करुन अांदाेलन करण्यात अाले.

Maharashtra Bandh : अारक्षणाच्या मागणीसाठी रक्तदान करुन अांदाेलन
पुणे : मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने महाराष्ट्र बंदची अाज हाक देण्यात अाली हाेती. पुण्यातील जिल्हाधिकार्यालयावर ठिय्या अांदाेेलन करण्यात अाले. यावेळी काही अांदाेलकांनी रक्तदान करुन अारक्षणाची मागणी केली.
सकाळी 11 च्या सुमारास जिल्हाधिकार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठिय्या अांदाेलनास सुरुवात करण्यात अाली. यावळी प्रवेशद्वाराच्या शेजारी रक्तदान करण्याची व्यवस्था करण्यात अाली हाेती. याठिकाणी अनेक अांदाेलक रक्तदान करुन अांदाेलनात सहभागी झाले हाेते. अारक्षणासाठी अामचे रक्त सळसळत असल्याच्या भावना अांदाेलकांनी यावेळी व्यक्त केल्या. अांदाेलकांच्या म्हणण्यानुसार शेकडाे अांदाेलकांनी याठिकाणी रक्तदान केले. मराठा समाजाला लवकरात लवकर अारक्षण द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात अाली. यावेळी संभाजी ब्रिगेड'चे संतोष शिंदे, चंद्रशेखर घाडगे, विठ्ठल सुर्यवंशी, ज्ञानेश्वर दारवटकर, शहाजी आरसुळ आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबीराचे संयोजन देवीसिंह शिंदे यांनी केले.
दरम्यान दुपारनंतर अांदाेलक अाक्रमक झाल्याने रक्तदान बंद करण्यात अाले.