शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

आपत्कालीन स्थितीत महामेट्रोच्या गाड्यांमध्ये होणार संवाद : सीबीटीएस यंत्रणा असणार कार्यान्वित 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 1:49 PM

परदेशातील प्रत्येक मेट्रो गाडीत ही यंत्रणा असते. ती पुण्यातील गाडीत जाणीवपुर्वक बसवण्यात आली आहे...

ठळक मुद्देअपघात टाळणारी यंत्रणा: भविष्यात चालकरहित गाड्यांची शक्यता मेट्रोचा मार्ग फक्त दुहेरी :गाडीही फक्त तीन डब्यांची

पुणे : शहराचा चेहरा बदलणाऱ्या मेट्रोच्या गाड्यांमध्ये महामेट्रो कंपनीकडून नवनवे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यात येत आहे. मार्गावर धावणाऱ्या गाड्या अडचणीच्या काळात एकमेकींशी संवाद साधतील अशी अत्याधुनिक यंत्रणा पुण्यातील मेट्रोच्या गाड्यांमध्ये बसवण्यात येणार आहे. भविष्यात चालक नसतानाही या गाड्या धावतील अशी क्षमता त्यात असणार आहे.सीबीटीएस (कम्यूनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टिम) असे या यंत्रणेचे नाव आहे. मार्गावरून धावणाऱ्या प्रत्येक गाडीत ही यंत्रणा असेल. मेट्रोचा मार्ग फक्त दुहेरी आहे. तसेच गाडीही फक्त तीन डब्यांची आहे. तरीही  गाडी जमिनीपासून २२ मीटर उंचीवर असणे, ती वेगात असणे, प्रत्येक १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्थानकातील तिचे थांबणे, अखेरच्या स्थानकावर वळून ( यू टर्न) पुढे जाणे, त्यामागे लगेच दुसरी गाडी असणे, गाडीतील यंत्रणा बिघडणे किंवा काही आपत्तीजनक घटना घडणे अशा बऱ्याच गोष्टी त्यात घडू शकतात. पुढे असणाऱ्या किंवा मागे असणाऱ्या गाडीला त्याची कल्पना मिळाली तर यापासून होणार अपघात टळू शकतात या विचाराने ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे.परदेशातील प्रत्येक मेट्रो गाडीत ही यंत्रणा असते. ती पुण्यातील गाडीत जाणीवपुर्वक बसवण्यात आली आहे. पुणे मेट्रोच्या सिग्नलिंग विभागाचे कार्यकारी संचालक मनोज गुरूमूखी यांनी सांगितले की ही संगणकीय प्रणाली आहे. त्यात संवेदक (सेन्सर) बसवले आहेत. दोन गाड्या एकमेकींपासून विशिष्ट अंतराच्या आतमध्ये असतील तर ही प्रणाली कार्यान्वित होईल. अंतराबाबतचा संदेश या प्रणालीतून मागील गाडीला जाईल. गाडी सुरू करू नका असा हा संदेश असेल. तो ऐकला गेला नाही तर गाडी सुरूच होणार नाही इतकी ही प्रणाली अद्ययावत आहे. त्याशिवाय गाडीला काही अडथळा निर्माण झाला असेल, गाडीमध्ये काही अडचण झाली असेल तरीही त्याप्रमाणे अशा संदेशांची देवाणघेवाण दोन गाड्यांमध्ये होईल. याच प्रणालीत आणखी सुधारणा केली तर गाडी चालकरहित करणेही शक्य असल्याचे गुरूमूखी यांनी सांगितले. चालकरहित गाडी दोन प्रकारची असते. पहिल्या प्रकारात चालक असतो, मात्र तो फक्त निगराणी करतो व दुसऱ्या प्रकारात गाडी पुर्ण चालकरहित असते. पुण्यातील गाड्या पहिल्या प्रकारात होणे भविष्यात शक्य आहे,  असे गुरूमूखी यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोAccidentअपघात