शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेसाठी महामोर्चा

By admin | Updated: July 16, 2014 04:19 IST

गुंजवणी धरणातील पुरंदरच्या हक्काचे २.०२ टीएमसी पाणी पुरंदर कृषी संजीवनी योजनेतून मिळावे, योजना मंजूर करण्याचे लेखी आश्वासन जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी लेखी द्यावे

सासवड : गुंजवणी धरणातील पुरंदरच्या हक्काचे २.०२ टीएमसी पाणी पुरंदर कृषी संजीवनी योजनेतून मिळावे, योजना मंजूर करण्याचे लेखी आश्वासन जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी लेखी द्यावे. अन्यथा बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी सासवड येथे दिला.सासवड येथील पालखी मैदानात जलदिंडीची सुरुवात करताना झालेल्या सभेत त्यांनी ही घोषणा केली. पुरंदरच्या पाणीप्रश्नावर पुण्यातील सिंचन भवनावर शिवसेनेच्या वतीने सासवड येथून जलदिंडी काढण्यात आली. गुंजवणी धरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तेथील पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. याचबरोबर पुरंदर तालुक्याला कालव्याद्वारे पाणी देणे शक्य नाही म्हणून शिवतारे यांनी गुंजवणी धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी योजना शासनाकडे सादर केली. या योजनेस २३ जुलै रोजी होणाऱ्या कृष्णा खोरे महामंडळाच्या बैठकीमध्ये प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी शिवतारे यांनी केली. सुरुवातीला शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. हवेलीमधील शिवसेना नेते शंकरनाना हरपळे, रा. स. प.चे अध्यक्ष महादेव जानकर, उपाध्यक्ष दशरथ राऊत, हडपसरचे आमदार महादेव बाबर यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. अतुल म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, या जलदिंडीत शंभर बैलगाड्या, गाढव, मेंढरे यांसह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)